चल उडुनि पांखरा पहा जरा—
किति रम्य पसरली वसुंधरा ll ध्रु ०ll
चोंच तुझ्या चोंचींत घालितां
गाढ उरीं तुज धरुनि पाळितां
न हो काळ कधिं सुखाचा रिता
स्वार्थच परि हा, न हा बरा ! ll १ ll
कोश फाडुनी कळ्यां उमलती,
खुल्या अंगणीं मुलें खिदळती,
खुल्या प्रदेशाकडे द्रुतगती
पळे खळाळत कसा झरा ! ll २ ll
ऊब इथें तुज मऊ पिसांची,
गोड ओढ जरि या घरिं साची,
पण ही छाया किती दिसांची ?
पहा निळें नभ, मुशाफरा ! ll ३ ll
विहंगमा रे, निज पंखांनीं
उडुनि विहर या जगदुद्यानीं
सराग गाउनि जीवन–गाणीं
अमृत हर रे मनोहरा ! ll ४ ll
– माधव त्र्यंबक पटवर्धन (माधव जूलियन)
संकल्पना : श्रीमती वनमाला पाटील, जालना
किति रम्य पसरली वसुंधरा ll ध्रु ०ll
चोंच तुझ्या चोंचींत घालितां
गाढ उरीं तुज धरुनि पाळितां
न हो काळ कधिं सुखाचा रिता
स्वार्थच परि हा, न हा बरा ! ll १ ll
कोश फाडुनी कळ्यां उमलती,
खुल्या अंगणीं मुलें खिदळती,
खुल्या प्रदेशाकडे द्रुतगती
पळे खळाळत कसा झरा ! ll २ ll
ऊब इथें तुज मऊ पिसांची,
गोड ओढ जरि या घरिं साची,
पण ही छाया किती दिसांची ?
पहा निळें नभ, मुशाफरा ! ll ३ ll
विहंगमा रे, निज पंखांनीं
उडुनि विहर या जगदुद्यानीं
सराग गाउनि जीवन–गाणीं
अमृत हर रे मनोहरा ! ll ४ ll
– माधव त्र्यंबक पटवर्धन (माधव जूलियन)
संकल्पना : श्रीमती वनमाला पाटील, जालना
No comments:
Post a Comment