फुटे क्षितिजी तांबडें जों न थोडें
तोंच जागें होतसे सर्व खेडें,
तरुण आखाड्याकडे धांव घेती
वृद्ध भूपाळ्या प्रभुस आळवीती ll १ ll
उठुनि गृहिणी लगबग अंगणांत
सडासंमार्जन करित राहतात,
आणि वृंदावन कुणी परसदारिं
नम्रभावें साष्टांग नमस्कारी ll २ ll
सान-थोरांना समय पहांटेचा
असा वाटें उत्साह-उमेदीचा,
मीहि मिळुनी त्यांच्यांत गमे जावें
आणि सौख्यी त्या भागिदार व्हावें ll ३ ll
पूर्ण शांती खेड्यात नांदताहे,
गाव-शीवेच्या वृक्ष-साउलीस
बसे कोणी पांथस्थ विसाव्यास ll ४ ll
निघे पाण्यावर गुरां-वासरांचा
थवा, येई वर लोट तो धुळीचा,
नाद कानावर पडे घुंगरांचा
सूर मिसळे त्यामधें पावरीचा! ll ५ ll
मोट सुटली, मोकळे बैल झाले
गडी सारे एकत्र जमुनी आले
बसुन पाटाच्या वाहत्या कडेला
सोडु आतां लागले न्याहरीला ll ६ ll
सान-थोरांना समय शांततेचा
असा वाटे हा गोड विसांव्याचा,
मीहि वाटे त्यांच्यात मिळुन जावें
आणि सौख्यी त्या भागिदार व्हावें ll ७ ll
कळस पिवळे शोभती देवळांचे,
थवा आकाशी उडे पांखरांचा
मार्ग धरुनी आपुल्या कोटरांचा ll ८ ll
दावणीशीं वासरें ओढ घ्याया
आणि आतां लागलीं हंबराया !
सांज झालेली, सुटे मंद वात
घरांमधुनी लागेल सांजवात ll ९ ll
समय सर्वांना हाच विसाव्याचा
एकमेकांना सुखें भेटण्याचा,
मीहि वाटे त्यांच्यात मिळुन जावें
आणि सौख्यी त्या भागिदार व्हावें ll १० ll
तोंच जागें होतसे सर्व खेडें,
तरुण आखाड्याकडे धांव घेती
वृद्ध भूपाळ्या प्रभुस आळवीती ll १ ll
उठुनि गृहिणी लगबग अंगणांत
सडासंमार्जन करित राहतात,
आणि वृंदावन कुणी परसदारिं
नम्रभावें साष्टांग नमस्कारी ll २ ll
सान-थोरांना समय पहांटेचा
असा वाटें उत्साह-उमेदीचा,
मीहि मिळुनी त्यांच्यांत गमे जावें
आणि सौख्यी त्या भागिदार व्हावें ll ३ ll
सूर्य मध्यान्हावरी चढत आहेO O O
पूर्ण शांती खेड्यात नांदताहे,
गाव-शीवेच्या वृक्ष-साउलीस
बसे कोणी पांथस्थ विसाव्यास ll ४ ll
निघे पाण्यावर गुरां-वासरांचा
थवा, येई वर लोट तो धुळीचा,
नाद कानावर पडे घुंगरांचा
सूर मिसळे त्यामधें पावरीचा! ll ५ ll
मोट सुटली, मोकळे बैल झाले
गडी सारे एकत्र जमुनी आले
बसुन पाटाच्या वाहत्या कडेला
सोडु आतां लागले न्याहरीला ll ६ ll
सान-थोरांना समय शांततेचा
असा वाटे हा गोड विसांव्याचा,
मीहि वाटे त्यांच्यात मिळुन जावें
आणि सौख्यी त्या भागिदार व्हावें ll ७ ll
ऊन पसरे कोंवळें सोनीयाचेंO O O
कळस पिवळे शोभती देवळांचे,
थवा आकाशी उडे पांखरांचा
मार्ग धरुनी आपुल्या कोटरांचा ll ८ ll
दावणीशीं वासरें ओढ घ्याया
आणि आतां लागलीं हंबराया !
सांज झालेली, सुटे मंद वात
घरांमधुनी लागेल सांजवात ll ९ ll
समय सर्वांना हाच विसाव्याचा
एकमेकांना सुखें भेटण्याचा,
मीहि वाटे त्यांच्यात मिळुन जावें
आणि सौख्यी त्या भागिदार व्हावें ll १० ll
— वा. भा. पाठक
No comments:
Post a Comment