एकमुखाने चला गाऊ या, गाणी नव्या युगाची
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची
सा म्हणतो साथी आपण, भेदभावना दूर करा
रे म्हणतो रेंगाळु नका रे, सदैव अपुले काम करा
निर्धाराने पुढे जाऊ या, पर्वा करू ना कोणाची ||
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची ||१||
ग म्हणतो गर्व मिरवुनी, सर्वनाश कुणी करू नका
म म्हणतो महान सुंदर, मानवतेचा मंत्र शिका
प म्हणतो परिश्रमाने, फुलवा ज्योत यशाची ||
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची ||२||
ध म्हणतो जगात केवळ, समानता हा धर्म खरा
नि म्हणतो निर्मळतेचा, मनी वाहू द्या नित्य झरा
सा म्हणतो सामर्थ्याने, उजळा उषा उद्याची ||
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची ||३||
— वंदना विटणकर

3 comments:
गुरूजी आजच्या युगात अशी मनाला लागणारी मराठीची कविता लोप्त होत जातं आहे. हे कविता तुम्ही आजच्या नवयुगातील मुलांना जतन करून देत आहे याच्या मला अभिमान वाटतो।।।।
मी एक संगीत शिक्षक आहे. आज अचानक शाळेत असताना ची ही कविता आठवली, असं वाटलं सापडेल की नाही ? परंतु ब्लॉगर च्या माध्यमातून हे शक्य झालं. या सुंदर रचनेकरिता कवींचे आभार....!👌
मी एक संगीत शिक्षक आहे. आज अचानक शाळेत असताना ची ही कविता आठवली, असं वाटलं सापडेल की नाही ? परंतु ब्लॉगर च्या माध्यमातून हे शक्य झालं. या सुंदर रचनेकरिता कवींचे आभार....!��
Post a Comment