दरीदरीतुन, वनावनांतुन,
झुळझुळ मी वाहत येते,
मी मंजुळ गाणे गाते,
मी पुढेच धावत जाते.
वसली गावे तीरावरती,
त्यांना भेटुनि जाते पुढती,
लतावृक्ष किती काठावरती,
भूमितुनी जे मला भेटती.
फुलवेली मज सुमने देती,
कुठे लव्हाळी खेळत बसती,
कुठे आम्रतरू माझ्यावरती,
शीतल अपुली छाया धरती.
पाणी पिउनी पक्षी जाती,
घट भरुनी कोणी जल नेती,
गुरे-वासरे जवळी येती,
मुले खेळती लाटांवरती.
मी कोणाची – मी सर्वांची,
बांधुनिही मज नेणाऱ्यांची !
जेथे जाईन – तेथे फुलवीन,
बाग मनोहर आनंदाची !
— वि.म. कुलकर्णी
झुळझुळ मी वाहत येते,
मी मंजुळ गाणे गाते,
मी पुढेच धावत जाते.
वसली गावे तीरावरती,
त्यांना भेटुनि जाते पुढती,
लतावृक्ष किती काठावरती,
भूमितुनी जे मला भेटती.
फुलवेली मज सुमने देती,
कुठे लव्हाळी खेळत बसती,
कुठे आम्रतरू माझ्यावरती,
शीतल अपुली छाया धरती.
पाणी पिउनी पक्षी जाती,
घट भरुनी कोणी जल नेती,
गुरे-वासरे जवळी येती,
मुले खेळती लाटांवरती.
मी कोणाची – मी सर्वांची,
बांधुनिही मज नेणाऱ्यांची !
जेथे जाईन – तेथे फुलवीन,
बाग मनोहर आनंदाची !
— वि.म. कुलकर्णी
8 comments:
हि माझी पहिली आवडती कविता जी मला पुन्हा इथे वाचायला मिळाली
अप्रतिम पुन्हा वाचायला मिळाली खुप आनंद वाटला
मला mp3पाठवा
माझ्याकडे MP3 फाईल उपलब्ध नाही.
Maji avadti kavita mala thode bol lakshat hote ( mi manjul gaane baate mi pudhech dhaavat jaate) marathi madhun taakla pahilyach site var he disla khup chaan mast vaatla aamchya time madhe chaangle dhade ani kavita asaychya
ही तिसरी कविता मला तिसरीत होती.. शाळेत असताना आमच्या बाई अगदी मंजुळ ही आवाजात ही कविता म्हणून दाखवायचा.. काही काही शब्द आठवायचे.. पण आज ती वाचून अगदी डोळे पाणावले..
ही कविता आता माझ्या मुलाला पाचवीत आहे. यातील जे शेवटचे कडवे आहे, त्यातील दुसऱ्या ओळीचा अर्थ कुणी सांगू शकेल का?
बांधुनिही मज नेणाऱ्यांची
'बांधुनिही मज नेणाऱ्यांची...'
म्हणजे जे नदीवर पाटबंधारे घालून, कालवे काढून मला त्यांच्यापाशी नेतात; त्यांचीही मी आहे. त्यांचीही बाग मी फुलविते, त्यांंनाही आनंद देते!
Post a Comment