A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

21 January 2017

पाळींव पोपटास

चित्रकार : श्री. श्रीमंत होनराव

हे डाळिंबाचे दाणे वेड्या l घात तुझा करिती ll ध्रुo ll

कवटी तूं कवठावरली
फोडिलीस एका काळीं
ती चोंच आज बोथटली
करितोस गुजारा धनी टाकितो त्या तुकड्यांवरती ll १ ll

मालक तव हौशी फार
करि माया जरि अनिवार
कुरवाळी वारंवार
तूं पाळिंव पोपट त्याचा म्हणुनी तुच्छ तुला गणिती ll २ ll

चैनींत घेत गिरक्यांसी
स्वच्छंदें वनिं फिरलासी
गगनांत स्वैर उडलासी
ते स्वातंत्र्याचे दिन सोन्याचे आठव तूं चित्तीं ll ३ ll

चाहिल तें झाड बघावें
त्यावरी स्वैर उतरावें
फळ दिसेल तें फोडावें
मग उडुनी जावें खुशाल, असली तेव्हांची रीती ll ४ ll

कितितरी फळें पाडाचीं
चोंचीनें फोडायाचीं
हि लीला तव नित्त्याची
पिंजऱ्यांत अडकुनि आयुष्याची झाली तव माती ll ५ ll

पूर्वीची हिंमत गेली
स्वत्वाची ओळख नुरली
नादान वृत्ति तव झाली
करितोस धन्याची 'हांजी हांजी' तूं पोटासाठीं ll ६ ll

येतांच धनी नाचावें
नाचत त्या सत्कारावें
तो वदेल तें बोलावें
तेव्हांच टाकितो मालक दाणे असले तुजपुढतीं ll ७ ll

हे दाणे दिसती छान
जरि लाल आणि रसपूर्ण
त्याज्य ते विषासम जाण
पिंजऱ्यांत मिळती म्हणुनि तयांची मुळिं नाही महती ll ८ ll

हा अध:पात तव झाला
डाळिंबचि कारण याला
भुलुनियां अशा तुकड्यांला
पिंजऱ्यांत मेले किती अभागी पोपट या जगतीं ll ९ ll



— काव्यविहारी (धोंडो वासुदेव गद्रे)

टिप :पाठ्यपुस्तकात सातच कडवी आहेत

27 comments:

Unknown said...

छान....सुंदर

Shabbdatur said...

खूप सुंदर ,कितीतरी दिवस ही कविता मी शोधत होतो बालाभारतीचे खूप धन्यवाद .हा अनमोल ठेवा आणखी समृद्ध होत जाओ.

Unknown said...

खूप सुंदर,कितीतरी दिवस ही कविता मी शोधत होतो बालाभारतीचे खूप धन्यवाद,हा अनमोल ठेवा आणखी समृद्ध होत जाओ...

Unknown said...

खुप छान लहान पनिचा वर्ग अठवला...

Unknown said...
This comment has been removed by a blog administrator.
Unknown said...

खुप छान 👌👌🙏

Unknown said...

अनेक दिवसा पासून ही कविता शोधत होतो.. धन्यवाद बालभारती

Unknown said...

Zakkas....I read this poem before 13 years when I am in only 2nd standard

Unknown said...

Zakkas....I read this poem before 13 years when I am in only 2nd standard

Unknown said...

खुपच छान कविता आहे..... खुप दिवस हि कविता शोधली ..आज मिळाली...खुप आनंद झाला...

हा मराठीचा अनमोल ठेवा जपून ठेवल्याबद्दल बालभारतीचे मनापासुन आभार....

Unknown said...

Superb

Bharat mane said...

खूप छान

Unknown said...

शाळेच्या आठवणींना उजाळा मिळाला

Unknown said...

Khup chan shalechi athavan zali.

Unknown said...

great work

Unknown said...

Balpan athaval..😊

Unknown said...

कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे स्वातंत्र्य काळापूर्वी एक मोठं नाव! तत्कालीन साहित्यावरही इंग्रज सरकारने अनेक निर्बंध घातले. त्या वेळी मग ही साहित्यिक मंडळी पुढे आली त्यांनी जागवला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अभिमान आणि तिच्या संगतीने कवितेच्या रूपांतरित शब्दाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा महिमा उठून दिसू लागला. युवकांच्या मनात चेतना आली, संवेदना आली, रक्त पेटून उठले कारण इंग्रजांनी दिलेले चार तुकडे म्हणजे डाळिंब! आणि आम्ही भारतीय जनता म्हणजे पोपट! आमची अशी भारतीय संस्कृती जिने कधी काळी कवठी ही फोडली होती आणि आज आम्ही गप्प आहोत. हेच मनात बिंबवलं, रुजवलं म्हणून साहित्यिकांचा, कवींचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान विसरता येत नाही!

Unknown said...

Thanks mala google var milali, shalet astana path hoti, ajun hi me gungunte, ata milalale sagle kadve. 👌👌

Unknown said...

Manala khup lagnare bhav aahet yat

Unknown said...

कवितेच्या पहिल्या चार ओळी आठवायाच्याच्या नंतर आठवाता आठवता कंटाळा यायचा. खूप दिवस ही कविता फक्त ओठावर यायची. संपूर्ण कविता शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण आज याठिकाणी मला ती मिळाली खूप आनंद झाला.. मनोमन सुखावलो आज.

Shraddhashish said...

अप्रतिम...

Unknown said...

माझी आवडती कविता धन्यवाद ही कविता टाकल्याबद्दल

श्री. कृष्णात दिनकर कांबळे. said...

बालभारतीचे खूप आभार. शालेय जीवनात ही कवीता मला खूप आवडायची. ती कवीता मला तुमच्या माध्यमातून मिळाली याबद्दल तुमचे आभार

Unknown said...

Khupach chan shaleche divas aathavle

Unknown said...

Khup khup sunder kavita hoti hi ��majhya khup shalechya athvni julalya karan hi Kavitha shiklyanatr 2 varshane mla akda exam mde poptache nibandh ala hota tr 2vrshanantrhi jsechya tse purn kavitecha arth mi vrnan kela hota ani madam mla far far shabaski dilya hotya ani class mde marathi mde highest ale hoty madam tya divshi kelela koutuk ajch nhi tr kdhihi visru shakat nhi karn te 2 varshapurvi ti kavita tyach madam ne shikvle hoty te ashcharyachakit zale ki mi shikvleli kavita 2 varshanantrhi jasachya tsa ks athavan rahila tula mnun bolle mla tr tyanchi teaching tevdhi ucch shrenichi hoti
Attasuddha majhe favourite teacher mnje tyach madam Tupkar madam������

Unknown said...

Suddenly Mala hi Kavita athawali Ani swatch keli chal nit nahi athawali pan khup enjoy keli

shashank Malviya said...

यह मेरे स्कूल की एक कविता है जिसे मुझे याद है कि मैंने इसे कंठस्थ कर लिया था, मैं अभी भी पूरी कविता को अपने दिमाग में दोहरा सकता हूं