तळहातीं शिर घेउनियाा । दख्खनची सेना लढली
तरि विजयी मोंगलसेना । नचही नामोहरम जाहली.
पडली मिठी रायगडला । सोडविता नाहीं सुटली.
मिरजेवर पातशहाची । शहाजणें वाजत होती
हाणिल्या तयांवर टापा । फाडून टाकिलीं पुरतीं
मारिली टांच तेथून । घेतला पन्हाळा हातीं
झुल्फिकार खान लढवय्या । कातरली झुल्फें त्याची
धुळधाण केली तेथें । किती अमीर उमरावांची
उसळली तेथुनी मांड । मग त्या कर्दनकाळाची
वाजल्या कुठें जरी टापा । धुरळ्याची दिसली छापा
छावणीत गोंधळ व्हावा । “संताजी आया ! आया !”
शस्त्रांची शुद्धी नाही । धडपडती ढाला घ्याया
गिरसप्पा वाहे ‘धों धों’ । प्रतिसारिल त्याला कोण ?
शिशिराचा वारा ‘सों सों’ । रोधील तयाला कोण ?
हिमशैल-खंड कोसळतां । तयाला प्रतिरोधील कोण ?
पुरताच बांधिला चंग । घोड्यास चढविला तंग
सोडी न हयाचे अंग । भाला बरचीचा संग
औरंगाचा नवरंग । उतरला जाहला दंग
न कळे संचरलें होते । तुरुंगासहि कैसें स्फुरण
उफळाया बघती वेगें । रिकिबींत ठेवितां चरण
जणु त्यांस हि ठावें होतें । युद्धी “जय कि मरण”
नेमानें रसद लुटावी । ‘नेमाजी शिंदे’ यांनीं
सांपडती हय गज तितुके । न्यावे ‘हैबतरावांनीं ’
वाटोळें सर्व करावें । ‘आटोळे’ सरदारांनीं
चढत्या घोड्यानिशी गेला । बेफाम धनाजी स्वार
करि कहर बागलांणात । ओली न पुशी समशेर
बसवितो जरब यवनांना । बेजरब रिसालेदार
नांवाचा होता ‘ संत ’ । जातीचा होता शूर !
शीलाचा होता ‘ साधू ’ । संग्रामीं होता धीर !
हृदयाचा ‘ सज्जन ’ होता, । रणकंदनिं होता क्रूर !
मर्दानी लढवय्यांनीं, । केलेल्या मर्दुमकीचीं
मर्दानी गीतें गातां, । मर्दानी चालीवरचीं
कडकडे डफावर थाप । मर्दानी शाहीरांची
तरि विजयी मोंगलसेना । नचही नामोहरम जाहली.
पडली मिठी रायगडला । सोडविता नाहीं सुटली.
राजरत्न राजाराम
कंठास त्यास लावून
जिंजीवरती ठेवून
परते सरसेनापतीची । घोडदौड संताजीची ||१ ||कंठास त्यास लावून
जिंजीवरती ठेवून
मिरजेवर पातशहाची । शहाजणें वाजत होती
हाणिल्या तयांवर टापा । फाडून टाकिलीं पुरतीं
मारिली टांच तेथून । घेतला पन्हाळा हातीं
तों कळलें त्या वीराला
जिंजीला वेढा पडला
पागेसह वेगे वळला
चौखूर निघे त्वेषाची । घोडदौड संताजीची || २ ||जिंजीला वेढा पडला
पागेसह वेगे वळला
झुल्फिकार खान लढवय्या । कातरली झुल्फें त्याची
धुळधाण केली तेथें । किती अमीर उमरावांची
उसळली तेथुनी मांड । मग त्या कर्दनकाळाची
जिंजीचा धुरळा मिटला
जालना प्रांती तो उठला
चोळीतो शत्रु नेत्राला
गेली हां हां म्हणतांची । घोडदौड संताजीची || ३ || जालना प्रांती तो उठला
चोळीतो शत्रु नेत्राला
वाजल्या कुठें जरी टापा । धुरळ्याची दिसली छापा
छावणीत गोंधळ व्हावा । “संताजी आया ! आया !”
शस्त्रांची शुद्धी नाही । धडपडती ढाला घ्याया
रक्तानें शरीरें लाल
झोपेनें डोळे लाल
जीवाचे होती हाल
शत्रूला ऐशी जाची । घोडदौड संताजीची || ४ ||झोपेनें डोळे लाल
जीवाचे होती हाल
गिरसप्पा वाहे ‘धों धों’ । प्रतिसारिल त्याला कोण ?
शिशिराचा वारा ‘सों सों’ । रोधील तयाला कोण ?
हिमशैल-खंड कोसळतां । तयाला प्रतिरोधील कोण ?
होता जो गंगथडीला
आला तो भीमथडीला
एकाच दिसात उडाला
करि दैना परसेनेची । घोडदौड संताजीची || ५ ||आला तो भीमथडीला
एकाच दिसात उडाला
पुरताच बांधिला चंग । घोड्यास चढविला तंग
सोडी न हयाचे अंग । भाला बरचीचा संग
औरंगाचा नवरंग । उतरला जाहला दंग
तुरगावर जेवण जेवी
तुरगावर निद्रा घेई
अंग ना धरेला लावी
भूमीस खूण टापांची । घोडदौड संताजीची || ६ || तुरगावर निद्रा घेई
अंग ना धरेला लावी
न कळे संचरलें होते । तुरुंगासहि कैसें स्फुरण
उफळाया बघती वेगें । रिकिबींत ठेवितां चरण
जणु त्यांस हि ठावें होतें । युद्धी “जय कि मरण”
शत्रूचे पडतां वेढे
पाण्याचे भरतां ओढे
अडती न उधळती घोडे
चालली अशी शर्थीची । घोडदौड संताजीची || ७ ||पाण्याचे भरतां ओढे
अडती न उधळती घोडे
नेमानें रसद लुटावी । ‘नेमाजी शिंदे’ यांनीं
सांपडती हय गज तितुके । न्यावे ‘हैबतरावांनीं ’
वाटोळें सर्व करावें । ‘आटोळे’ सरदारांनीं
‘खाड खाड' उठती टापा
झेपांवर घालीत झेपा
गोटावर पडला छापा
आली म्हणती काळाची । घोडदौड संताजीची || ८ || झेपांवर घालीत झेपा
गोटावर पडला छापा
चढत्या घोड्यानिशी गेला । बेफाम धनाजी स्वार
करि कहर बागलांणात । ओली न पुशी समशेर
बसवितो जरब यवनांना । बेजरब रिसालेदार
वेगवान उडवित वाजी
तोंडावर लढतो गाजी
धावून येई संताजी
पळती मोंगल बघतांची । घोडदौड संताजीची || ९ || तोंडावर लढतो गाजी
धावून येई संताजी
नांवाचा होता ‘ संत ’ । जातीचा होता शूर !
शीलाचा होता ‘ साधू ’ । संग्रामीं होता धीर !
हृदयाचा ‘ सज्जन ’ होता, । रणकंदनिं होता क्रूर !
दुर्गति संभाजीची
दैना राजारामाची
अंतरीं सर्वदा जाची
उसळे रणशार्दूलाची । घोडदौड संताजीची ||१०||दैना राजारामाची
अंतरीं सर्वदा जाची
मर्दानी लढवय्यांनीं, । केलेल्या मर्दुमकीचीं
मर्दानी गीतें गातां, । मर्दानी चालीवरचीं
कडकडे डफावर थाप । मर्दानी शाहीरांची
देशाच्या आपत्कालीं
शर्थीचीं युद्धें झालीं
गा शाहीरा ! या कालीं
ऐकूं दे विजयश्रीची । घोडदौड संताजीची ||११||शर्थीचीं युद्धें झालीं
गा शाहीरा ! या कालीं
— दु. आ. तिवारी (दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी)
संकल्पना : श्रीमती वनमाला पाटील, जालना आणि सोहन पाटील
5 comments:
खूपच सुंदर
मस्त !
काही चूका आहेत, त्या दुरुस्त व्हाव्यात।
कृपया चूका निदर्शनास आणून दिल्यास दुरुस्त करायला सोपं जाईल.
अप्रतिम
माझ आवडत काव्य, चुका आहेत त्या दुरुस्त करा, हे काव्य मराठ्यांची संग्रामगिते या काव्यखंडातील आहे, या प्रकारातील तिवारींची सर्व गिते त्या खंडात आहेत व तो काव्यखंड माझ्याकडे आहे, मला संपर्क करा मी तुम्हाला चुका काय आहेत त्या सांगतो. ८६००७७१००१
चूका दुरुस्त केल्या आहेत.
Post a Comment