कंसारी संसारगजकेसरी | हासोनि बोले श्रीकृष्ण शौरी |
पांडुपुत्र हे निर्धारी | भीमार्जुन जाण पां ||
मागे अपराध केले क्षमा | ते कार्याकारणे पुरुषाधमा |
लोटली मर्यादेची सीमा | शेवटी फळ भोगी का ||
सरला सुकृताचा तंतू | आयुष्यतैला झाला अंतू |
माझिये हस्ती व्यजनवातू | भीमरूपे उदेला ||
तो झगटतां सत्वरगती | प्राणदीप पंच ज्योती |
मालवोनि पडेल क्षिती | गात्र पात्र पालथे ||
तिघांमाजी जो आवडे | त्यासीच भिडीजे इडेपाडे |
मागध म्हणे मूर्खा! तोंडे | जल्प करिसी वाचाटा ||
तू बहुरूपी खेळसी सोंगे | कोणते युद्ध जिंकिले आंगे |
वेडी बागडी भाविकें भणगे | तुझे शूरत्व त्यांमाजी ||
पार्थ पृथेचे सुकुमार बाळ | शस्त्राभ्यासी गेला काळ |
मजसि योग्य परि अळुमाळ | भीम काही दिसतसे ||
तोही मंद जड आळसी | बहुत आहार निद्रा त्यासी |
आयुष्य सरले म्हणोनि ऐसी |बुद्धि उदेली तुम्हांते ||
तिघांते हाणोनि चडकणा | क्षणामाजी मेळवीन मरणा |
बळे सर्पाचिया सदना | मंडूक वस्ती पावला ||
मंडूक किंवा तिघे गरुड | आत्ताचि होईल हा निवाड |
समय प्राप्त झालिया वाड | बोल टाकी माघारा ||
ऐसे बोलतां चक्रपाणी | उभे ठेले समरांगणी |
जरासंधे राज्यासनीं | अभिषेकिले सहदेवा ||
— मुक्तेश्वर (मुक्तेश्वर चिंतामणी मुदगल)
(Compiled by : Mr. Nikhil Bellarykar)

2 comments:
ही कविता त्यावेळी अभ्यासक्रमातून वगळण्यात आली होती. कदाचित हिंसक वाटली असावी. पण असे प्रसंगवर्णन क्वचितच पाहायला मिळते.
गात्र पात्र पालथे"....
या नंतर अजून दोन कडवे आहेत.
"करी रायांचे बंध मोचन...
... "
"आता बोलीलासी वचन...
... "
Post a Comment