उत्तर म्हणे, 'असें जरि मीं एकाकी लहान, परि सवतें
यश जोडितों चि असता सारथि तरि, कथन मज न परिसवतें ll १ ll
होता परम निपुण, परी त्या ख्यात रणांत सारथि गळाला,
झांको छिद्र भलतसा; अडले म्हणतात 'सार' थिगळाला ll २ ll
कर्णादिकांसि देता समरीं वैराटिकेसरी करिता,
जिष्णुपुढें असुरजनीं कोण्ही वैरा टिके सरी करिता ? ll ३ ll
मिळवा कोण्ही तरि, हो ! धैर्याचा मात्र उदधि सारथि जो,
कुरुभटसमूह पावुनि मज, जेंवि हिमासि सुदधिसार थिजो' ll ४ ll
ऎसे बहुत चि बोले तो बालिश बोल बायकांमाजी,
चित्रपटकटकसें शिशुभाषण येईल काय कामा ? जि ! ll ५ ll
तें परिसुनि एकांतीं पार्थ म्हणे, 'देवि ! कृष्णसखि ! जावें
उत्तरसारथि होवुनि म्यां, त्वां मजवरि कदापि न खिजावें' ll ६ ll
त्या उत्तरासि सांगे, 'सारथ्य बृहन्नडा करिल; यातें
सूत करुनि, विजयानें नेले बहु खांडवीं अरि लायातें' ll ७ ll
कुरुकटकासि पहातां तो उत्तर बाळ फार गडबडला,
स्वपरबळाबळ नेणुनि बालिश बहु बायकांत बडबडला ll ८ ll
बोले, 'बृहन्नडे ! हें कुरुबळ कल्पांतसिंधुसें गमतें,
ने रथ पुरात, माजें मन नयन हि पाहतां बहु भ्रमतें ll ९ ll
दुर्योधन, दु:शासन, कर्ण, कृप, द्रोण, भीष्म ज्या कटकीं
त्यांत मरेन चि शिरतां, काट्यांवरी घालितां चिरे पट कीं' ll १० ll
— मोरोपंत

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)
12 comments:
अप्रतिम..,
जुनी आठवण ताजी झाली
My favorite one
अप्रतिम रचना
छान
छान रचना आज महाभारतातील प्रसंग पाहून कविता आठवली मस्तच
आजच महाभारत या सिरीयल मध्ये वरील प्रसंग बघण्यात आला आणि या सुंदर कवितेची आठवण झाली
एकदम १० व्या वर्गात बसल्या सारखे वाटले.
महाभारत मालिका पाहताना शाळेत शिकलेल्या या कवितेची आठवण झाली. पुन्हा ती वाचतांना डोळे भरून आले.
खरंय.. मोरोपंतची स्मरणीय कविता
परत वर्गात बसुन ही कविता शिकावी वाटतेय ...
अतिशय सुरेख वर्णन
Post a Comment