शांत बहरलेली रात्र … आकाश कसे जवळ आले आहे
तेज गोठावे तसे साठले आहेत
पांढर्या ढगांचे पुंजके दक्षिणेला
चांदण्यादेखील मोजून घ्याव्यात इतक्याच….
विखुरलेल्या… स्निग्ध.
उंच इमारती झाल्या आहेत अबोल….
दिवे केव्हाच विझून गेलेत
वारा फक्त झुळझुळत आहे पडद्यांना हेलकावे देत किंचित
लांबलचक पसरले आहेत रस्ते निर्जन… पावले दूर गेलेली
सारेच स्वर बुडाले आहेत निद्रेच्या संथ प्रवाहात खोल
जाणवतो आहे फक्त शांततेचा रंग
गडद… गंभीर… काळाभोर
पलीकडे सारेच आकार हरवले आहेत… त्यात माझाही.

— श्रीमती शिरीष व्यंकटेश पै
(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)
No comments:
Post a Comment