A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

5 July 2014

रानवेडी

पोर डोंगराव भाळली
त्याच्या नादी लागुनिया
अख्ख्या रानात पांगली ॥धृ.॥

रानगवताची फुलं
तिच्या कानामंदी डूल
अन् चाईचा मोहर
गळ्यामंदी गळसर
अहो टनटनी फुलली
तिच्या नाकामंदी फुली
अन् बुरांडीची फुलं
तिनं केसांत माळली ॥१॥

पोर माळावर खेळली
अन् वार्‍यासंग बोलली
वड-पारंबीचा झुला
तीचा गेला आभाळाला
पानसाबरीचं बोंड खाल्लं
लाल झालं तोंड
अहो हसता हसता
मऊ गवताव लोळली ॥२॥

गायी दांडाच्या वाटानं
चाली यंगत नेटानं
ढोल ढगांचा वाजला
नाच मोराचा पाहिला
आली पाऊस पहाळी
तव्हा गडदीक पळाली
पावसानं भिजवली
तरी उन्हात वाळली ॥३॥

तिचं मन डोंगरात
तिला दिलं शहरात
आता गच्चीवर जाते
दूर डोंगर न्याहाळते
त्याचा आठव येऊन
येतो हुंदका दाटून
त्याला हात जोडताना
दोन आसवे गाळली॥४॥


तुकाराम धांडे,
इगतपुरी, नाशिक


चाई = एका वेलीचे नाव       बुरांडी = एका फुलाचे नाव       पानसाबरी = निवडुंग           पळाली = पावसाची सर      यंगत = चढत किंवा डोंगर वरवर चढणे

18 comments:

Unknown said...

मला आदरणीय धांडे सरांसोबत पत्रव्यवहार करण्यासाठी पत्ता आणि संपर्क क्रमांक पाहिजे.

Suresh Shirodkar said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

खूप छान कविता सर

प्रविण निकम said...

मी कालच भेटलो....खुपच साधी राहणी आणि आदर्शवत व्यक्तीमत्व

Unknown said...

nice poem

Unknown said...

धांडे भाषा ..
कोणती आदिवासी भाषा आहे??

Unknown said...

7887938204 मला call kara me सांगतो

Unknown said...

चावडीच्या पाठिमागे उभा जुनाट पिंपळ ।
अजूनही येते त्याची कानी मंद सळसळ ।

हि कविता मिळत नाही मिळाल्यास संग्रहात प्रसिद्ध करा.

अप्रतिम संकलन.

Saurabh gunjal said...

हे बुरांडी चे झाड म्हणजे काय आहे नेमकं.....मी सगळं google search केलं पण मला सापडलं नाही.कोणी सांगू शकेल का कृपया 9970728166

Unknown said...

Yangat cha arth kay

Unknown said...

डोंगर चढणे

sujatalaxmansolase said...

खुपच सुंदर काव्य आहे.

Unknown said...

यंगत म्हणजे काय सांगा

Balbharati Kavita said...

यंगत म्हणजे चढत.
किंवा डोंगर वरवर चढणे.

Harishchandragad Food & Camping said...

एकदम छोटी फुल वनस्पती आहे।

Harishchandragad Food & Camping said...

डांगानी

Gautam Bhutale said...

बुरांडी फुलाचे चित्र आहे का सर

Pradip keshav davange �� said...

मला सरांचा पत्ता , जन्म ,गाव , यांची माहिती पाहिजे आहे .कुणाला माहीत असेल तर सांगा ...plz 🙏🏻🙏🏻