असो, बरकत धूळपेरणीला,
लागला मातीचा जीव झुरणीला.
हिरव्या पिसांचा ध्यास घरणीला,
टिपूर मोत्यांची आस मोरणीला.
येऊ नये कधी दिवस जाचक,
कासावीस डोळे बनले चातक.
कोरडे नक्षत्र पूर पापणीला,
आलेलं आभूट दूर दाटणीला
मिळता डोळ्यांना मेघुट इशारे,
मातीच्या कणांना फुटते धुमारे.
— अशोक कौतिक कोळी
धूळपेरणी = पावसाळा सुरु होण्यापूर्वी केलेली पेरणी आभूट = ढगाळ आकाश मेघुट = ढग दाटून येणे
लागला मातीचा जीव झुरणीला.
हिरव्या पिसांचा ध्यास घरणीला,
टिपूर मोत्यांची आस मोरणीला.
येऊ नये कधी दिवस जाचक,
कासावीस डोळे बनले चातक.
कोरडे नक्षत्र पूर पापणीला,
आलेलं आभूट दूर दाटणीला
मिळता डोळ्यांना मेघुट इशारे,
मातीच्या कणांना फुटते धुमारे.
— अशोक कौतिक कोळी
धूळपेरणी = पावसाळा सुरु होण्यापूर्वी केलेली पेरणी आभूट = ढगाळ आकाश मेघुट = ढग दाटून येणे
No comments:
Post a Comment