आमी जलमलो मातीत किती होनार गा माती
खापराच्या दिव्यात या कधी पेटनार वाती.
किती घरातून सूर्य जातं होऊन फिरते
पिठासारख्या उजिळ घरभर पसरते
काया म्हसीवानी रात नित आमच्या दारात
निऱ्हा अंधार भरली बसे पखाल रिचोत
नाही पाहेली पुनिव लय आईकल्या गोठी
आमी जलमलो ....
फास लावून जल्लद चाले कोनाचा वखर
खाली ढेकलाच्या वानी आमी होतो चुरचूर
फुलवल्या कापसाले चंद्र चोरू चोरू पाहे
तरी माय मावलीची मांडी उघळीच राहे
ऊभं अभाय फाटलं कसी झाकनार छाती
आमी जलमलो ....
दाने भरता कन्सात येती हुशार पाखरं
भर हंगामात अशा होते पारखी भाकर
तहा पोटातली आग पेट घेते आंगभर
मंग सोंगेल फनाची अनी होते धारदार
कोनं सांगावं रगत तिले लागनार किती
खापराच्या दिव्यातून मंग पेटतील वाती
आमी जलमलो ....
— विठ्ठल वाघ
सौजन्य : वाङ्मातृ <http://vaakmaatru.blogspot.in>
वऱ्हाडी बोलीत 'ळ' आणि 'र' यांचा सामान्यपणे 'य' होतो.
निऱ्हा = निव्वळ, गोठी = गोष्टी, तहा = तेव्हा, सोंगेल = कापलेले, अनी = तीक्ष्ण टोक, जल्लद = धारदार.
खापराच्या दिव्यात या कधी पेटनार वाती.
किती घरातून सूर्य जातं होऊन फिरते
पिठासारख्या उजिळ घरभर पसरते
काया म्हसीवानी रात नित आमच्या दारात
निऱ्हा अंधार भरली बसे पखाल रिचोत
नाही पाहेली पुनिव लय आईकल्या गोठी
आमी जलमलो ....
फास लावून जल्लद चाले कोनाचा वखर
खाली ढेकलाच्या वानी आमी होतो चुरचूर
फुलवल्या कापसाले चंद्र चोरू चोरू पाहे
तरी माय मावलीची मांडी उघळीच राहे
ऊभं अभाय फाटलं कसी झाकनार छाती
आमी जलमलो ....
दाने भरता कन्सात येती हुशार पाखरं
भर हंगामात अशा होते पारखी भाकर
तहा पोटातली आग पेट घेते आंगभर
मंग सोंगेल फनाची अनी होते धारदार
कोनं सांगावं रगत तिले लागनार किती
खापराच्या दिव्यातून मंग पेटतील वाती
आमी जलमलो ....
— विठ्ठल वाघ
सौजन्य : वाङ्मातृ <http://vaakmaatru.blogspot.in>
वऱ्हाडी बोलीत 'ळ' आणि 'र' यांचा सामान्यपणे 'य' होतो.
निऱ्हा = निव्वळ, गोठी = गोष्टी, तहा = तेव्हा, सोंगेल = कापलेले, अनी = तीक्ष्ण टोक, जल्लद = धारदार.
2 comments:
खापराचे दिवे कविता सारांश हवा आहे.ty
महाशय, मी इथे बालभारती पाठ्यपुस्तकातल्या कवितांचे फक्त संकलन करतो. कवितेचे विश्लेषण, भावार्थ किंवा सारांश लिहीत नाही आणि तो माझा पेशा नाही.
Post a Comment