चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ,
तेथील हिरवी गंमत जंमत डोळे भरुनी पाहू.
लाल लाल ही माती, इथले डोंगर हिरवे हिरवे,
डोईवरती आकाशाने रंग पसरले बरवे.
मासोळ्यांचे सूर पाहण्या, होडीमधुनी जाऊ,
निळ्या रुपेरी लाटा येती सागर काठावरी,
मोर नाचरे काढीत जाती नक्षी वाळूवरी.
जिवास वाटे घर कौलारू बांधून तेथे राहू,
चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ ll ४ ll
— रविकिरण पराडकर
तेथील हिरवी गंमत जंमत डोळे भरुनी पाहू.
लाल लाल ही माती, इथले डोंगर हिरवे हिरवे,
डोईवरती आकाशाने रंग पसरले बरवे.
मासोळ्यांचे सूर पाहण्या, होडीमधुनी जाऊ,
चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ ll १ ll
वन बांबूचे, रान काजूचे अन आंब्याची राई,
नारळ, जांभूळ, फणस गोड हा मेवा देऊनी जाई.
झावळ्यातुनी माडांच्या रे चंद्र पसरतो बाहू,
चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ ll २ ll
ओढ्यावरती सांकव आहे खाली वाहे पाणी,
झाडावरती पक्षी गाती मंजूळ मंजूळ गाणी.
शहाळ्यातले पाणी पिऊनी पक्ष्यांसंगे गाऊ,
चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ ll ३ ll
मोर नाचरे काढीत जाती नक्षी वाळूवरी.
जिवास वाटे घर कौलारू बांधून तेथे राहू,
चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ ll ४ ll
— रविकिरण पराडकर
चित्रकार : रमेश मुधोळकर, पुणे |
2 comments:
Nice!!!
मला माझे बालपणातील दिवस या कविते मुळे आठवले मि तुमचा खुप आभारी आहे
Post a Comment