चावडीच्या पाठीमागे । जुना सरकारी वाडा ।
अर्ध्या पडक्या भिंतींचा । थर पांढरा केवढा ।। १ ।।
पटांगणाचा सोबती । उभा जुनाट पिंपळ ।
अजूनही येते कानी । त्याची मंद सळसळ ।। २ ।।
खिळखिळे झाले गज । अशा खिडक्या लांबट ।
छपराच्या कौलातून । ऊन हळू डोकावत ।। ३ ।।
खाली धुळीची जमीन । राठ टेबल समोर ।
किलबिल थांबे क्षण । छडी नाचता ज्यावर ।। ४ ।।
चिंचा पेन्सिलींचा सौदा । अंकगणिताचे ताळे ।
नवा शर्ट दहा बुक्के । सारे गुपचूप चाले ।। ५ ।।
तुळशीशी जाता उन्हे । घणघण वाजणारी ।
उंच आढ्याशी टांगली । घंटा घोडीच्या शेजारी ।। ६ ।।
शाळा सुटे पाटी फुटे । घरा वळती पाउले ।
वना निघाली मेंढरे । वाट त्यातून न मिळे ।। ७ ।।
अशी माझी उंच शाळा । होती पिंपळा जवळी ।
मन भिरभिरे तीत । कधी बनून पाकोळी ।। ८ ।।
— वि. म. कुलकर्णी

(संकलन - कविवर्य उपेंद्र चिंचोरे, पुणे)
2 comments:
खूप दिवसांपासून शोधत होते ही कविता. सापडल्यावर इतका आनंद झाला की माझी शाळाच डोळ्यासमोर आली.
माझ्या लेकीला अंगाई म्हणून हि कविता माझी बायको नेहमी म्हणत असते. सहज आज internet वर कविता शोधून वाचली असता आमची पार्ले टिळक विद्यालयाची जुनी इमारत डोळ्यासमोर झर्रकन आली. काळानुरूप शाळेच्या जुन्या इमारतीऐवजी नवीन इमारत उभारलेली आहे. पण ज्या जुन्या इमारतीत आम्ही शिकलो ती वास्तू मनात कायमचं घर करून वसलेली आहे.
Post a Comment