या बसा पाव्हनं असं, रामराम घ्या !
कोनच्या तुम्ही गांवाचं ? गाठुडं तिठं राहुंद्या !
घोंगडी टाकली इठं, बसा तीवर
अनमान करुं नका आतां, हें समजा अपुलं घर
वाढूळ चालतां जनूं, लई भागलां
हें पगा, काढलंय पाणी, आंघूळ कराया चला
आटपा बिगीनं जरा, ताट वाढलं
पाव्हनं, चला या आतां, हें पगा पिढं टाकलं
वाढली पगा ज्वारिची जाड भाकरी
निचितीनं जेवा आतां, जायचं न शेतावरी
लइ सुगरण मपली बरं कारभारिण
किती अपरुक झालं हाए, हें कांद्याचं बेसन !
लसणीची चटणी उजुन पगा वाढली
ती मधून तोंडी लावा, लागती तिखट चांगली !
चापून अतां होउं द्या, करुं नका कमी
मीठभाकरी गरीबाची, घ्या गोड करोनी तुम्ही
इकत्यांत कसं उरकलं? हें नव्हं खरं
आनकी येक चतकोर, घ्यायला पाहिजे बरं !
कां राव हात राखुनी असं जेवतां ?
ए अगS वाढ कीं त्यांना, हां ब्येस जाहलं अतां !
हो, झालंच आतां, उठा, चला भाइर
घ्या हातावरतीं पाणि, नी बसा पथारीवर
पाव्हनं, नीट भिंतिला बसा टेंकुनी
हें खांड घ्या सुपारीचं, घ्या तोंडामदिं टाकुनी
ही भरली चिलमीमदीं तमाखू अहा !
पेटली कशी पण नामी, झुरका तर घेउन पहा
जायचं काय म्हंगतां ? झोंप घ्या जरा
जाताल उद्यां, कां घाई ? छे, बेत नव्हं हा बरा
भारीच तुम्ही हे बुवा, जायचंच का ?
तारीख चालली वायां, गरिबाचं ऎकु नका
शेवटीं निघालांत ना ? जपूनीच जा
गरिबाची ओळख ठेवा, या बरं, रामराम घ्या !
– ग. ल. ठोकळ
कोनच्या तुम्ही गांवाचं ? गाठुडं तिठं राहुंद्या !
घोंगडी टाकली इठं, बसा तीवर
अनमान करुं नका आतां, हें समजा अपुलं घर
वाढूळ चालतां जनूं, लई भागलां
हें पगा, काढलंय पाणी, आंघूळ कराया चला
आटपा बिगीनं जरा, ताट वाढलं
पाव्हनं, चला या आतां, हें पगा पिढं टाकलं
वाढली पगा ज्वारिची जाड भाकरी
निचितीनं जेवा आतां, जायचं न शेतावरी
लइ सुगरण मपली बरं कारभारिण
किती अपरुक झालं हाए, हें कांद्याचं बेसन !
लसणीची चटणी उजुन पगा वाढली
ती मधून तोंडी लावा, लागती तिखट चांगली !
चापून अतां होउं द्या, करुं नका कमी
मीठभाकरी गरीबाची, घ्या गोड करोनी तुम्ही
इकत्यांत कसं उरकलं? हें नव्हं खरं
आनकी येक चतकोर, घ्यायला पाहिजे बरं !
कां राव हात राखुनी असं जेवतां ?
ए अगS वाढ कीं त्यांना, हां ब्येस जाहलं अतां !
हो, झालंच आतां, उठा, चला भाइर
घ्या हातावरतीं पाणि, नी बसा पथारीवर
पाव्हनं, नीट भिंतिला बसा टेंकुनी
हें खांड घ्या सुपारीचं, घ्या तोंडामदिं टाकुनी
ही भरली चिलमीमदीं तमाखू अहा !
पेटली कशी पण नामी, झुरका तर घेउन पहा
जायचं काय म्हंगतां ? झोंप घ्या जरा
जाताल उद्यां, कां घाई ? छे, बेत नव्हं हा बरा
भारीच तुम्ही हे बुवा, जायचंच का ?
तारीख चालली वायां, गरिबाचं ऎकु नका
शेवटीं निघालांत ना ? जपूनीच जा
गरिबाची ओळख ठेवा, या बरं, रामराम घ्या !
– ग. ल. ठोकळ
2 comments:
' गरिबिचा पाहुणचार '
माझ्या वडत्या कवितांपैकी ही एक कविता .
बालपण अस्सल खेड्यांतून गेल्यामुळे पाहुणचार अशाच आत्मियतेने होत असे . पाहुणे यावे वाटायचे . गरिबीतही जमेल तसा पाहुण्यांची सरबराई केली जयची.
'अतिथी देवो भव ही भावना असायची'---
घरोघरी हीच रीत असायची .
अनंतराव घोगले . धनकवडी , पुणे .
माझी अत्यंत आवडती कविता. आज सापडली. खेडे गावचे जीवन, पाहुणचार, अगत्य आता कमी झाले आहे. गरिबीत पण आनंदाने राहायचे, आलेल्याचे स्वागत जमेल तसे करायचे. सत्य सांगायचे. लाजायचे नाही. अती दुर्मिळ झाजे आहे.
Post a Comment