आठवते ना-
ओढयाकाठी अपुल्या घरची
गाय घेऊनी धावत होतो
चरावयाला सोडूनिया तिज
पारंब्यावर लोंबत होतो !
आठवते ना-
करवंदाचा चीक बिलगता
बोटे अपुली बसली चिकटून
अन कैऱ्यांच्या दिवसामध्ये
हातकातडीं गेली सोलून
मला तरी नित आठवते गा
आठवते ते फुलते जीवन
आक्रसलेल्या चाळीमध्ये
उबगुनी जाता देह आणि मन
– वि. म. कुलकर्णी
(Compiled by : Ms. Mrudula Tambe)
ओढयाकाठी अपुल्या घरची
गाय घेऊनी धावत होतो
चरावयाला सोडूनिया तिज
पारंब्यावर लोंबत होतो !
आठवते ना-
डोहामधले स्वैर डूंबणे
अंगावरचे ओले कपडे
अंगावरती तसेच सुकणे,
सुकता कपडे पुन्हा पोहणे
आठवते ना-
करवंदाचा चीक बिलगता
बोटे अपुली बसली चिकटून
अन कैऱ्यांच्या दिवसामध्ये
हातकातडीं गेली सोलून
आठवते ना-
हातामध्ये हात घालुनी
अर्धा डोंगर गेलो चढूनी
वर्गामधल्या गोष्टी बोलत
उन्हात फिरलो शेतांमधूनी
मला तरी नित आठवते गा
आठवते ते फुलते जीवन
आक्रसलेल्या चाळीमध्ये
उबगुनी जाता देह आणि मन
– वि. म. कुलकर्णी
(Compiled by : Ms. Mrudula Tambe)
3 comments:
Thank you!
बालपनाच्या जीवनाशी एकरूप असलेली हीच ती कविता.जी माझ्या प्राथमिक शाळेतील अभ्यासक्रमात समाविष्ट होती.बऱ्याच वेळा गूगलवर शोधत होतो. कवी चांगले लक्षात होते, परंतु कविता पुसटशी लक्षात होती. तुमच्या ब्लॉग मूळेच कवितेचा आनंद पुन्हा घेता आला.प्रतिभावान कवी वि.म.कुलकर्णी यांस साष्टांग दंडवत.व तुम्हास खूप खूप शुभेच्छा.
Baryach varshani punha ekda shalet gelyasarkhe vatale. std. 7 pasun aaj tagayat tond pat asleli kavita. khup chaan kavita aahe.
Post a Comment