तुज हृदयंगम रवें विहंगम-भाट सकाळीं आळविती,
तरू तीरींचे तुजवरि वल्ली पल्लवचामर चाळविती;
तुझ्या प्रवाहीं कुंकुम वाही बालरवी जणुं अरुणकरीं,
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरीं ॥१॥
अवयव थिजले, शरीर भिजलें, उठले रोम तृणांकुरसे,
सद्गद कंठीं बुदबुद करितें वचन घटोन्मुख नीर जसें;
अधर थरारे, अश्रुमलिनमुख हो मतिसंकर मदंतरीं,
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरीं ॥२॥
मधुमासामधिं मधूर हवा ती, स्पर्श मधुर तव मधुर चवी,
सायंप्रातः सेवियली ती साखर वानिल केविं कवी?
किति कितिदां तरि तरंग तुझिये अवलोकियले म्यां नवलें !
अभिनव तनुला जलकुंभ्यासम तवावगाहन मानवलें ॥३॥
अस्तोन्मुख रवि कुंकुम, केशर, चंदन वाहुनियां तुजला,
वसंतपूजा करितां तूझी तासावरूनि दिसे मजला;
करिती झुळझुळ विंझणवारे या समयीं तुज त्या झुळकी,
संध्या करितां रमवि तुझें हें दर्शन देवि ! सुमंजुळ कीं ! ॥४॥
गंगे ! येतां ग्रीष्म दिनान्ती पवनहि तव जलकेलि करी,
जे रवितेजो-ग्रहणें करपति, ते कर चंद्र तुझ्यांत धरी;
मासे तळपति, तरंग झळकति, तुषार चमकति, जेविं हिरे !
या समयाला रुप तुझें हें दिसतें रम्य किती गहिरें ! ॥५॥
लंघुनि तट जें प्रावृटकालीं सैरावैरा धांवतसे,
तवौदार्य तें असीम होऊनि सलील वाहे सलिल नसे;
तल्लीलेमधिं तल्लीन न हो कल्लोलिनि ! कवि कवण तरी ?
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरीं ॥६॥
वरि घन वरसति धो, धो, इकडे महापुराच्या घनगजरीं
'कृष्ण कृष्ण' जन, 'झन चक झन चक' टाळ, मृदंगहि दंग करी
अभंग-गंगा जणुं शतधा ही वाहुनि मिसळे त्वदंतरीं,
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरीं ॥७॥
परिसर जलमय, वनकुसुमांनी झांकुनि जाती कुंप, वया,
उभय तटींचीं हिरवीं, चित्रित, शेतें डोलति ज्या समया,
तव तृण धान्यें, सुमनें, सुफले, सुचविति चंगळ हीं अगदीं !
गंगथडीचें रंगुनि राहे मंगलरुपचि भाद्रपदीं ॥८॥
सायंकालीं स्फटिकविमल तव गंगे ! जल नहि वानवतें
या समयाला सुधाकराचें वैभव त्यांतुनि कालवतें;
नयनमनोरम तरंगतांडव रसरुपी शिव करुनि हंसे,
स्वर्गंगेचें प्रतिबिंबचि जणुं गंगा होउनि हें विलसे ॥९॥
हिमऋतुमाजीं प्रभातकालीं बाष्प तवौघावर तरतें,
सकरुण वरुणें शाल धवल ते भासे घातलि तुजवरते;
जणुं म्हणुनिच जें सुखोष्ण लागे गे ! मज घे घे त्या उदरीं
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरीं ॥१०॥
शिशिरामाजीं गांगहि शिशिरचि, करी हिमाची बरोबरी,
ताप दुजे हिम हरिंतें परि तें भवतापातें काय करी ?
तया गदावरि गदा बसे ह्या––ह्या अगदाची निरंतरीं,
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरीं ॥११॥
– चंद्रशेखर

No comments:
Post a Comment