(चाल : नृपममता रामावरती)
मुलगा :-
हा हार शुभ्र किति आई
किति कोमल सुंदर पाहीं । क्षणभरी ।
किती वास मधुर या येई
मम चित्त ओढुनी घेई । बघ तरी ।
कशिं फुलें डंवरलीं असतीं
किति अलंकार त्यांपुढती । बहुपरी ।
भूवरी
जन्म घे तरी
वास जनशिरीं
कसा हा मिळवी
जनमनें कशानें वळवी । वद तरी ॥१॥
आई :-
मधुवासें प्रिय हा सकलां
स्वगुणांनी तूं हो बाळा । त्यापरी ।
हा धवलत्वें सुंदरसा
चारित्र्यें शोभे तैसा । तूं तरी ।
हा दिपवि जसा नगभारा
तेजें तूं लोपविं धीरां । त्यांपरी ।
यापरी
वागशिल जरी
सकल जन तरी
तुजशि मम तनया
शिरि धरितिल हारासम या । कधिं तरी ॥२॥
- राम गणेश गडकरी
मुलगा :-
हा हार शुभ्र किति आई
किति कोमल सुंदर पाहीं । क्षणभरी ।
किती वास मधुर या येई
मम चित्त ओढुनी घेई । बघ तरी ।
कशिं फुलें डंवरलीं असतीं
किति अलंकार त्यांपुढती । बहुपरी ।
भूवरी
जन्म घे तरी
वास जनशिरीं
कसा हा मिळवी
जनमनें कशानें वळवी । वद तरी ॥१॥
आई :-
मधुवासें प्रिय हा सकलां
स्वगुणांनी तूं हो बाळा । त्यापरी ।
हा धवलत्वें सुंदरसा
चारित्र्यें शोभे तैसा । तूं तरी ।
हा दिपवि जसा नगभारा
तेजें तूं लोपविं धीरां । त्यांपरी ।
यापरी
वागशिल जरी
सकल जन तरी
तुजशि मम तनया
शिरि धरितिल हारासम या । कधिं तरी ॥२॥
- राम गणेश गडकरी
2 comments:
माझ्या आजी ला होती ही कविता लहानपणी ❤️
या कविता उपलब्ध केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद! माझ्या आजीला अगदी तोंडपाठ होती ही कविता आणि अतिशय गोड आवाजात गायची ती ही कविता! कविता वाचून आठवणी ताज्या झाल्या❤️
Post a Comment