(वसंततिलका)
सर्वांगसुंदर, सुभूषणवस्त्रयुक्त
चैतन्य, वाणि, मन, बुद्धिहि ज्या प्रशस्त
ऐसे शरीर, परि शील नसे तयास
आहे मनोहर तरी गमतें उदास II १ II
वैडुर्य-आदिकरुनी बहुदिव्यरत्नीं
शृंगारिले भवन की विविधप्रयत्नी
नाही तयांत गृहिणी जरि, तें मनास
आहे मनोहर तरी गमतें उदास II २ II
सौंदर्यखाणि, सुनया, विमला, सुशीला
विद्याविभूषित गुणी अशि मुग्ध बाला
दैवेचि हो गतधवा जरि ती जनास
आहे मनोहर तरी गमतें उदास II ३ II
आम्रादिकी गगनचुंबित थोर वृक्षी
उद्यान एक भरले, लतिकाविशेषी
तेथें परंतु न वसंत करी विलास
आहे मनोहर तरी गमते उदास II ४ II
पुष्पे, फले, खग, मुले, सुविचारमाला
नक्षत्रपंक्ति, गगनी तशिही विशाला
ऐशा मनोहर चमत्कृति पूर्ण खास
आहे मनोहर तरी गमतें उदास II ५ II
निद्रेत मी नृपति होउनी, सौख्य भोगी
कीं चित्पदी मिळुनि जाइं बनोनी जोगी
जेव्हां कळे सकल हा परि स्वप्नभास
आहे मनोहर तरी गमतें उदास II ६ II
विद्या, कला, कुशलता, बहु जेथ होत्या
जैं सृष्टिसुंदरिविलासनिवास होत्या
उत्साहहीन बघता अजि भारतास
आहे मनोहर तरी गमतें उदास ! II ७ II
विद्वान सुशिक्षित समाजधुरीण लोक
मोठ्या उदार मतिने लिहितात लेख
तैशा कृती न करिती, स्थिती ही मनास
आहे मनोहर तरी करिते उदास II ८ II
— सरस्वतीकंठाभरण (गणपतराव उर्फ दादासाहेब बापूजी शिंदे)
हि कविता दिनकर नानाजी शिंदे ह्यांची आहे की गणपतराव उर्फ दादासाहेब बापूजी शिंदे ह्यांची आहे ह्याबद्दल साशंकता आहे.
सर्वांगसुंदर, सुभूषणवस्त्रयुक्त
चैतन्य, वाणि, मन, बुद्धिहि ज्या प्रशस्त
ऐसे शरीर, परि शील नसे तयास
आहे मनोहर तरी गमतें उदास II १ II
वैडुर्य-आदिकरुनी बहुदिव्यरत्नीं
शृंगारिले भवन की विविधप्रयत्नी
नाही तयांत गृहिणी जरि, तें मनास
आहे मनोहर तरी गमतें उदास II २ II
सौंदर्यखाणि, सुनया, विमला, सुशीला
विद्याविभूषित गुणी अशि मुग्ध बाला
दैवेचि हो गतधवा जरि ती जनास
आहे मनोहर तरी गमतें उदास II ३ II
आम्रादिकी गगनचुंबित थोर वृक्षी
उद्यान एक भरले, लतिकाविशेषी
तेथें परंतु न वसंत करी विलास
आहे मनोहर तरी गमते उदास II ४ II
पुष्पे, फले, खग, मुले, सुविचारमाला
नक्षत्रपंक्ति, गगनी तशिही विशाला
ऐशा मनोहर चमत्कृति पूर्ण खास
आहे मनोहर तरी गमतें उदास II ५ II
निद्रेत मी नृपति होउनी, सौख्य भोगी
कीं चित्पदी मिळुनि जाइं बनोनी जोगी
जेव्हां कळे सकल हा परि स्वप्नभास
आहे मनोहर तरी गमतें उदास II ६ II
विद्या, कला, कुशलता, बहु जेथ होत्या
जैं सृष्टिसुंदरिविलासनिवास होत्या
उत्साहहीन बघता अजि भारतास
आहे मनोहर तरी गमतें उदास ! II ७ II
विद्वान सुशिक्षित समाजधुरीण लोक
मोठ्या उदार मतिने लिहितात लेख
तैशा कृती न करिती, स्थिती ही मनास
आहे मनोहर तरी करिते उदास II ८ II
— सरस्वतीकंठाभरण (गणपतराव उर्फ दादासाहेब बापूजी शिंदे)
हि कविता दिनकर नानाजी शिंदे ह्यांची आहे की गणपतराव उर्फ दादासाहेब बापूजी शिंदे ह्यांची आहे ह्याबद्दल साशंकता आहे.
10 comments:
vidwaan sushixit -> breaks the metre.
Should read: vidwaan shixit .
"दैवेचि हो गतधवा जरि ती जनास" ह्या ओळीचा काय अर्थ आहे?
जिचे वैभव, तेज संपलेले असते अशा विधवा स्त्रीला 'गतधवा' म्हणतात.
so true.. very meaningful poem
स्त्रीचे दुर्दैवाने विधवा होणे.
Sunita Deshpande took her famous title of her book on Pu La from this poem written by relatively less famous poet. While audience is watching Bhai Vyakti ki Valli and Shanta Gokhale is writing in English in scroll.in on her book this poet is totally forgotten by Marathi population. I'm going to quote the whole poem, then suggesting to Shanta Gokhale that she should have referred to this poet, additionally she should have used the famous title 'and Pine for what is not' of Gauri Deshpande rather than translating it as 'All is Beautiful though'
फारच छान .अशी मराठी आता लुप्त होत आहे
Vaidurya mhanje kay?
वैदूर्य (संस्कृत : वैडूर्य) म्हणजे एक खडा ज्याला लसण्या किंवा इंग्लीश मध्ये Cat's Eye म्हणतात.
आहे मनोहर तरी गमते उदास ही कविता गणपतराव उर्फ दादासाहेब बापूजी शिंदे ह्यांची आहे . ते सारस्वतीकणठभरण टोपण ह्या नावाने कविता करत असत। प्रसिद्धीपराडमुखतेचा स्वभाव असल्यामुळे त्यांचे नाव सर्वंसृत नव्हतं आणि अनावधानाने दुसऱ्या कोणाचे नाव छापले गेले।
Post a Comment