[दोहा]
जोर मनगटांतला पुरा
घाल, घाल खर्ची;
हाण टोमणा, चळ न जरा;
अचुक मार बर्ची ! ll १ ll
दे टोले जोंवरी असे
तप्त लाल लोखंड;
येईल आकारास कसें
झाल्यावर ते थंड ? ll २ ll
उंच घाट हा चढूनियां
जाणें अवघड फार;
परि धीर मनीं धरुनियां
न हो कधीं बेजार ! ll ३ ll
यत्न निश्चयें करुनी तूं,
पाउल चढतें ठेव;
मग शिखराला पोंचुनि तूं,
दिसशिल जगासि देव ! ll ४ ll
ढळूं कधींही देउं नको
हृदयाचा निर्धार;
मग भय तुजला मुळीं नको,
सिद्धि खास येणार ! ll ५ ll
झटणें हें या जगण्याचें
तत्त्व मनीं तूं जाण;
म्हणून उद्यम सोडूं नको,
जोंवरि देही प्राण ! ll ६ ll
— केशवसुत

6 comments:
जोर मनगटातला..
हाण टोमणा, चळ न जरा....
Corrections
Thanks Unknown.
My all time favorite poem..Got after long days
वर्ग ४ ५ वि मनापासून वाचलि होति
अजूनही आठवले
माझी सर्वात आवडती कविता.कधी मन निराश झाले की फक्त ही कविता अठविते व पुन्हा नवीन जोम, उत्साह अंगात संचारतो.
१९९०-९१ साली इयत्ता ५वीच्या पाठ्यपुस्तकातील ही कविता...
आजही पहिली २ कडवी जशीच्या तशी पाठ आहेत.
Post a Comment