(उपेंद्रवज्रा)
तया वनी एक तटाक तोये
तुडुंबले; तामरसानपाये
निरंतरामंद मरंद वाहे
तपातही यास्तव रिक्त नोहे ll १३ ll
(द्रुतविलंबित)
अमृतही पयही म्हणवितसे
उभय होय तसी रुचि वितसें
मधुर सारस तें जल गा तसें
मधुर सारस यास्तव गातसे ll १४ ll
(वसंततिलका)
पीतां मरंद उदरंभर बंभराचें
जें होय मंदिरही सुंदर इंदिरेचें
जें पद्म तेथिल सहस्र–दळा धरीतें
प्रत्यक्ष सूर्यकिरणांस विसाववीतें ll १५ ll
(दिंडी)
तया कासारी राजहंस पाहे
राजहंसाचा कळप पोह्ताहे
तयासाठी हे वापिकाच पोहे
नळे केली हें कोण म्हणे नोहे ll १६ ll
तया हंसांचे देह कांचनाचे
पक्ष झळकती वीज जशी नाचे
रंग माणिकसे चंचुचे पदांचे
जसे अधरीचे भीम–कन्यकेचे ll १७ ll
(वसंततिलका)
त्यांतील एक कलहंस तटीं निजेला
जो भागला जल-विहार विशेष केला
पोटीच एक पद, लांबविला दुजा तो
पक्षीं तनू लपवि भूप तया पहातो ll १८ ll
टाकी उपानह पदें अति–मंद ठेवी
केली विजार वरि डौरहि, मौंन सेवी
हस्ती करी वलय उंच अशा उपायीं
भूपें हळूच धरिला कलहंस पायीं ll १९ ll
(मालिनी)
कलकल कल–हंसे फार केला सुटाया
फडफड निज–पक्षीं दाविलें कीं उडाय
नृपतिस मणि–बंधी टोंचिंता होय चंचू
धरि सुदृढ़ जया तो काय सोडील पंचू " ll २० ll
तदितर खग भेणें वेगळाले पळाले
उपवन–जल–केली जे कराया मिळाले
स्व–जन गवसला जो त्याजपाशीं नसे तो
कठिन समय येतां कोण कामास येतो ll २१ ll
कठिन समय येतां कोण कामास येतो ll २१ ll
— रघुनाथ पंडित (रघुनाथ गणेश नवहस्त/नवाथे)
इथे पाठ्यपुस्तकातील निवडक वेचे एकत्र करून तीन भागांत विभागून दिलेले आहेत त्यांतील हा दुसरा भाग आहे.
7 comments:
I NEVER FORGATE THIS POEM.
KHUOACH CHAN KAVITA AAHE,
thank you for keeping record of this
My fevorate kavita
तदितर खग भेणें वेगळाले पळाले
उपवन-जल केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशीं नसे तो
कठिन समय येतां कोण कामास येतो ll २१ ll
भावार्थ काय होईल याचा?
कठीण वेळ येते तेंव्हा कुणी कुणाकडे पहात नाही,जे व जेव्हडे हाती लागेल ते घेऊन पळत सुटतात.
आयला माणूस संकटात आहे त्या जवळ कोणी नसते, खरच कठीण प्रसंगी कोण कामास येतो.
गर्भित उत्तर कोणीच नाही
My father everytime tell us the meaning and sung in tal .That shows reality social life
Post a Comment