वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
कधि बाजारी तर कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधि रमत गमत वा कधी भरारी थेट
लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जातां जातां सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा
गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
झुळझुळ झर्यांची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात
वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानीं सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुलें बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी
दिनभरी राबुनी दबला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा
— दामोदर अच्युत कारे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
कधि बाजारी तर कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधि रमत गमत वा कधी भरारी थेट
लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जातां जातां सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा
गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
झुळझुळ झर्यांची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात
वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानीं सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुलें बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी
दिनभरी राबुनी दबला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा
— दामोदर अच्युत कारे
28 comments:
अप्रतिम कविता...
Jaan hoti Kavita,😘👌👌😀😀
एकदम भारी काम केलंय तुम्ही,कविता संग्रहीत करून
Meaning kha hai
कवितेचा अर्थ जर येथे समजऊन सन्गितला तर इंग्लिश ंंमाध्यम चा ंंमुलाना अर्थ स्म्जवने खूप कठिन आहे ंंनॉर्मल palakansathi
वाटते सानुली...ही दामोदर कारे यांची कविता कोणत्या कवितासंग्रहातील आहे?
अतिशय सुंदर कविता.शाळेत असताना चालीत म्हणताना खूप मजा यायची.
खूप सुंदर कविता. माझ्या वडीलांच्या लहानपणी त्यांचा शाळेत शिकवलेली कविता.आम्ही भावंड लहान असताना ही कविता म्हणून झोपवायचे. खूप छान चालीत कविता म्हणतात...आजही त्यांच्या आवाजात खूप गोडवा आहे...माझ्या मुलाला झोपवताना हीच कविता म्हणून झोपवितात...त्यांच्या काळात शिक्षक सगळ्या वर्गाला निसर्गाच्या सानिध्यात कविता शिकवायचे...ऐकूनच किती छान वाटते...आजही त्यांच्या सर्व कविता पाठ आहेत.
Poem meaning in hindi
Kavita avadnyachi Karen Sanga plzzzz
Sukhad anubhav denari ek apratim kavita
Wonderful.Nostalgic feeling
Old is gold
निसर्गाचा अतिशय सुरेख वर्णन कोमल कोवळ्या शब्दात केलय,आत्ता इतक्या वर्षांनी, जवळजवळ 60,कवितेचा वेगळा अर्थ जाणवतोय,आपल्या अचपळ मनाचे ,एका फुलावरून दुसर्या फुलावर उडणार्या अबलख लाभल्यासारख्या विचाराचे वर्णन झुळूक करतेय अस वाटत.कविता परत वाचताना विश्व आठवले
Very nice
😉😳😳
Changli ahe hi Kavita
चौफे र काय पसरावेअसेकवी दामोदर कारेयांना वाटते?
Iridi
खूपच सुंदर अशी कविता लिहिलय sir तुम्ही.... पहीलीतला वर्ग आठवला मला ही कविता वाचून . खूप आवडायची ही झुळूक कविता मला.... खरच मन प्रफुल्लित होऊन जाते ही कविता वाचल्याने....👌👌👌😊🙏
4th std madhe hoti hi kavita 2003 year i was in 4 th std
अप्रतिम कविता लहानपणी शिकलेली,छान आजही गविशी वाटते.
खुपच छान
Very nice
Very nice poeyam
Mazya khup aavadichi Hoti Kavita
खूप खूप धन्यवाद,अतिशय आवडती कविता तुमच्यामुळे सापडली.बालपणीचा खजिनाच.धन्यवाद.
Post a Comment