(वृत्त : पादाकुलक)
काळोखाची रजनी होती,हृदयी भरल्या होत्या खंती;
अंधारांतचि गढलें सारे
लक्ष न लक्ष्यी वरचे तारे;
विमनस्कपणे स्वपदें उचलित
रस्त्यातुनि मी होतो हिंडत;
एका खिडकींतुनि सूर तदा
पडले - दिड दा, दिड दा, दिड दा ! ll १ ll
जड हृदयीं जग जड हे याचा,सोसाट्याचे वादळ येते
प्रत्यय होता प्रगटत साचा;
जड ते खोटें हें मात्र कसे
ते नकळे; मज जडलेंच पिसें;
काय करावे, कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावें !
मग मज कैसे रुचतील वदा
ध्वनि हे - दिड दा, दिड दा, दिड दा? ll २ ll
तरि ते तेव्हां मज मानवतें;
भुतें भोंवती जरी आरडती
तरि ती खचितची मज आव़डती;
कारण आतिल विषण्ण वृत्ती
बाह्य भैरवी धरिते प्रीती;
सहज कसे तिज करणार फिदा
रव ते - दिड दा, दिड दा, दिड दा ? ll ३ ll
ऐकूनि ते मज तो त्वेष चढे,सरलों पुढता चार पावलें
त्यासरशी त्या गवाक्षाकडे
मूठ वळुनी मी हात हिसकला;
पुटपुटलोही अपशब्दांला;
म्हटलें – “आटप, आटप मूर्खा !
सतार फोडुनि टाकिसी न कां !
पिरपिर कसली खुशालचंदा,
करिसी - दिड दा, दिड दा, दिड दा !” ll ४ ll
तो मज न कळे काय जाहले
रुष्ट जरी मी सतारीवरी
गति मम वळली तरी माघारी;
ध्वनिजालीं त्या जणूं गुंतलो
असा स्ववशता विसरुनि बसलों -
एका ओट्यावरी स्थिर तदा
ऐकत - दिड दा, दिड दा, दिड दा !ll ५ ll
तेथ कोपरें अंकीं, टेंकुनिस्कंधी माझ्या हात ठेवुनी
करांजलीला मस्तक देउनि
बसलों; इतुक्यामाजी करुणा -
रसपूर्ण गती माझ्या श्रवणां
आकृष्ट करी; हृदय निवालें,
तन्मय झालें, द्रवलें; आलें -
लोचनांतुनी तोय कितीकदां
ऐकत असतां - दिड दा, दिड दा ! ll ६ ll
आश्वासी मज गमले कोणी,
म्हणे - “खेद का इतुका करिसी ?
जिवास का बा असा त्राससी?
धीर धरी रे ! धीरापोटी
असती मोठीं फळें गोमटीं !
ऐक, मनीच्या हरितील गदा
ध्वनि हे – दिड दा, दिड दा, दिड दा !” ll ७ ll
आशाप्रेरक निघू लागलेवाद्यांतुनि त्या निघती नंतर
सूर, तधी मी डोळे पुशिले;
वरती मग मी नजर फिरविली,
नक्षत्रें तों अगणित दिसलीं;
अस्तित्वाची त्यांच्या नव्हती
हा वेळवरी दादच मज ती!
“तम अल्प - द्युति बहु" या शब्दां -
वदती रव ते - दिड दा, दिड दा ! ll ८ ll
उदात्ततेचे पोषक सुस्वर;
तों मज गमलें विभूति माझी
स्फुरत पसरली विश्वामाजी;
दिक्कालांसहि अतीत झालों;
उगमीं विलयीं अनंत उरलों;
विसरुनि गेलो अखिला भेदां
ऐकत असतां - दिड दा, दिड दा ! ll ९ ll
प्रेमरसाचे गोड बोल तेशांत वाजली गती शेवटी;
वाद्य लागता बोलायातें,
भुललों देखुनि सकलहि सुंदर;
सुरांगना तो नाचति भूवर;
स्वर्ग धरेला चुंबायाला
खाली लवला - मजला गमला !
अशा वितरिती अत्यानंदा
ध्वनि ते – दिड दा, दिड दा, दिड दा ! ll १० ll
शांत धरित्री, शांत निशा ती,
शांतच वारें, शांतच तारे,
शांतच हृदयीं झालें सारे !
असा सुखे मी सदना आलो,
शांतीत अहा ! झोपी गेलो,
बोल बोललो परि कितिकदा
स्वप्नीं - दिड दा, दिड दा, दिड दा ! ll ११ ll
- कृष्णाजी केशव दामले
सौजन्य : keshavsut.com
No comments:
Post a Comment