बेलाग दुर्ग जंजीरा वसईचा किल्ला असला
दुश्मन 'फिरंगी' तिथला आटोपे ना कोणाला !
त्या सिंहाला पकडाया भारतीय 'चिमणा' सजला !
दुश्मन 'फिरंगी' तिथला आटोपे ना कोणाला !
त्या सिंहाला पकडाया भारतीय 'चिमणा' सजला !
गोव्याचा टोपीवाला
कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयांला
बुद्धीचा डाव उडाला, मोहरा इरेला पडला ! || १ || कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयांला
मर्द त्या मराठी फौजा रणकीर्ति जयांच्या गाव्या
तळहातीं शिर घेउनियां चालूनि तटावरि जाव्या
जणुं घोंगावत मधमाशा मोहोळाला बिलगाव्या
कडकडाट वरुनी व्हावा
सारखा अग्नि वर्षावा
परि सिंहाचा तो छावा
परतेना हिंमतवाला, मोहरा इरेला पडला ! || २ ||सारखा अग्नि वर्षावा
परि सिंहाचा तो छावा
बोलावुनि सरदारांना तो समरधुरंधर बोले
"शूरांनो ! वेढा द्याया चार मास होऊनि गेले
आवडते कंठमणीही कार्य काय त्यांनीं केलें ?
बेहिंमत जे असतील
परतोनी ते जातील
मी आहे निश्चयशील
जा कळवा श्रीशाहूला," मोहरा इरेला पडला ! || ३ ||परतोनी ते जातील
मी आहे निश्चयशील
"घालुनी उडी संग्रामीं जिंकील भयंकर काळ
मी असा घेतला होता एकेक निवडुनी लाल
मी तुम्हांस मानित होतों शौर्याचे तेजोगोल
जाहली परीक्षा आजी
मति खिन्न जाहली माझी
म्हणतील काय ते बाजी ?
जा कळवा कीं दादाला, मोहरा इरेला पडला || ४ ||मति खिन्न जाहली माझी
म्हणतील काय ते बाजी ?
तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे
शिर तुटुनी त्या आघातें किल्ल्यात पडू द्या त्यातें
प्रिय असेन जरि तुम्हांतें पुरवाच अंतीमेच्छेतें. "
ती निर्वाणीची वाणी
डोळ्यांला आणी पाणी
प्रत्येक वदे गहिंवरुनी
'इर्षेस वीर हा चढला, मोहरा इरेला पडला !" ||५||डोळ्यांला आणी पाणी
प्रत्येक वदे गहिंवरुनी
लागला विषारी बाण सकलांच्या अंतःकरणी
शस्त्रांस पोंचले हात लढवय्यांचे फुरफुरुनी
उतरुनी रक्त डोळ्यांत नजराही गेल्या फिरुनी
ध्वनि 'हर हर' ऐसा झाला
पाठीच्या सुटल्या ढाला
बोलती सकल या बोला
"राखूं निज लौकीकाला," मोहरा इरेला पडला ! || ६ || पाठीच्या सुटल्या ढाला
बोलती सकल या बोला
गोळ्यांच्या माऱ्याखाली चर खोदोनी रेतींत
उडविले सुरंगी बार तट लोळविला मातींत
गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारांत
जो बांध तटाचा फुटला
तों सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला
बंदुकीस भाला भिडला मोहरा इरेला पडला ! || ७ ||तों सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला
कदमाच्या पुढतीं कदम चालले कदम सरदार
वारावरि करितचि वार अनुसरले शूर पवार
शिंध्यांचा खंदा घोडा चालला जणूं की तीर
बावटा धरुनि तोंडांत
भोंसला चढे जोमांत
आगीच्या वर्षावांत
सामना भयंकर झाला, मोहरा इरेला पडला ! || ८ ||भोंसला चढे जोमांत
आगीच्या वर्षावांत
गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु कितिकांच्या धडपडल्या
छातीचे निधडे वीर चिंध्या परि त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना
शत्रूची पकड सुटेना
तो विजयश्रीचा 'चिमणा'
बेहोष होऊनी लढला, मोहरा इरेला पडल ! || ९ ||शत्रूची पकड सुटेना
तो विजयश्रीचा 'चिमणा'
शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावरि चढला
जयनादानें वसईचा दिग्प्रांत अहा ! दुमदुमला
पोर्तुगीज किल्लेवाला अप्पांच्या शरणीं आला
राष्ट्राची वाढे कीर्ती
तो समय आणि ती मूर्ती
ठाके कविनयनांपुढतीं
आठवतां या वाक्याला, 'मोहरा इरेला पडल !' || १० ||तो समय आणि ती मूर्ती
ठाके कविनयनांपुढतीं
— दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी