परसातील कुंड्यांत सकाळी
दिवे लावले कुणी ?
बिनवातीचे बिनतूपाचे
निरांजनावाचुनी ?
उजाडल्यावर घराघरांतील
मालवले ना दिवे ?
अंगणात बाहेर मग अता
दिवे कशाला हवे ?
मालवले ना दिवे ?
अंगणात बाहेर मग अता
दिवे कशाला हवे ?
या सूर्याच्या उजेडातही
उजेड यांचा पडे !
नवल खरोखर कि विझती ना
वाऱ्यांच्या झापडे !
कुंड्यांतुनही दिव्यादिव्यांची
कशी मौज थाटते !
या आरतीने ओवाळावे —
देवाला, वाटते.
मज न काळे हि कशी दिव्यांची
जादू घडली असे ?
परसातील कुंड्यांत सकाळी
दिवे लागले कसे ?
कुणि सूर्य-परी करुन गेली
दिवेलागणी जणू !
तर या दीपत्काराला मी
शुभं करोति म्हणू ?