१
१
चिमणी येते नि कावळा येतो,कोण कोण येते — कोण कोण येते ?
होला येतो नि पारवा येतो,टपटप दाणे टिपून जातो — टिपून जातो.
मैना येते नि पोपट येतो,हू हू घू घू करून जातो — करून जातो
मोर येतो नि लांडोर येते,मंजूळ मंजूळ बोलून जातो — बोलून जातो.
माझ्या या हौदावरथय थय थुई थुई नाचून जाते — नाचून जाते.
२
चिमणी येते नि कावळा येतो,कोण कोण येते — कोण कोण येते ?
होला येतो नि पारवा येतो,बुडबुड गंगे न्हाऊन जातो — न्हाऊन जातो.
मैना येते नि पोपट येतो,थेंबथेंब पाणी पिऊन जातो — पिऊन जातो.
मोर येतो नि लांडोर येते,पाणी उडवून खेळून जातो — खेळून जातो.
माझ्या या बागेतथुई थुई थुई थुई नाचून जाते — नाचून जाते.
३
चिमणी येते नि कावळा येतो,कोण कोण येते — कोण कोण येते ?
मैना येते नि पोपट येतो,इकडे तिकडे उडून जातो — उडून जातो.
मोर येतो नि लांडोर येते,पेरु, डाळिंब खाऊन जातो — खाऊन जातो.
कोकीळ येतो नि बुलबुल येतो,आंब्याच्या डहाळीवर झुलून जाते — झुलून जाते.
गोड गोड गाणी गाऊन जातो — गाऊन जातो.
— ताराबाई मोडक
No comments:
Post a Comment