त्या अंधाऱ्या प्रदेशात
सूर्योदय घेऊन मी जात आहे.
केविलवाणे सूर्यास्त वळणावळणांवर
खाली मान घालून उभे आहेत
शरणागतांसारखे !
त्यांच्या निर्वासित आशा
हद्दपार झाल्या होत्या शतकांपूर्वीच
बहिष्कृत केलेले होते
त्यांच्या जीवनाचे आनंदोत्सव
सूर्योदय घेऊन मी जात आहे.
केविलवाणे सूर्यास्त वळणावळणांवर
खाली मान घालून उभे आहेत
शरणागतांसारखे !
त्यांच्या निर्वासित आशा
हद्दपार झाल्या होत्या शतकांपूर्वीच
बहिष्कृत केलेले होते
त्यांच्या जीवनाचे आनंदोत्सव
दोस्तहो ....... !
तुमच्या डोळ्यांतील वाळवंट पुसून टाका
तिथे पेरायला आणल्यात मी
नवप्रेरणांच्या तेजस्वी बहरकळ्या,
धुऊन टाका चेहर्यावरला भयग्रस्त अंधार
प्रकाशाचे दिवे आणलेत मी तुमच्यासाठी
तुमच्या ऐतिहासिक शापांना
तुडवले मी वादळग्रस्त पावलांनी
आणि बंधमुक्त केलेत तुमचे कोंडलेले श्वास
राजहंसांनो ....... !
ओळखा तुमच्या तेजस्वी रूपाला
नि लुटा तुमच्या तडफदार युक्तीचा विजय
दोस्तांनो ....... !
तुमच्यासाठी मी सूर्योदय आणलेत
प्रकाशमान व्हा, प्रकाशमान व्हा !
— हिरा गुलाबराव बनसोडे
No comments:
Post a Comment