A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

21 November 2015

इथें

(जाति : समुदितमदना)

आम्रतरू हा धरी शिरावर प्रेमळ निज साउली,
मृदुल, कोंवळी, श्यामल हिरवळ पसरे पायांतळी
आणिक पुढतीं झरा खळाळत खडकांतुन चालला,
साध्या, भोळ्या गीतामध्यें अपुल्या नित रंगला !

कांठी त्याच्या निळीं लव्हाळीं, डुलती त्यांचे तुरे,
तृणांकुरांवर इवलालीं हीं उडतीं फुलपांखरें !
खडा पहारा करिती भंवतीं निळेभुरे डोंगर,
अगाध सुंदर भव्य शोभतें माथ्यावर अंबर !

दुर्मिळ ऐशी देइ शांतता सदा मला हें स्थल,
ऎकुं न येई इथें जगाचा कर्कश कोलाहल.
व्याप जगाचा विसराया मी येइ इथें सत्वर,
अर्धोन्मीलित नयनीं बघतें स्वप्नें अतिसुंदर.

शांतविलें मी तप्त जिवाला इथें कितीदां तरी;
कितीदां यावें तरी येथली अवीट ही माधुरी !


— शांता ज. शेळके

11 comments:

Unknown said...

सुंदर कविता, लहानपणी माझी बहिण ही कविता पाठ म्हणायची ,मामा कडे Nationalpanasonic चा टेपरेकॉर्डर आणला होता त्यामध्ये तिच्या आवाजात टेप केले होते. काळाच्या ओघात टेपरेकॉर्डर पडद्याआड गेले, ती कविता आज सहज वाटले गूगल वर type करून बघावे म्हटले, आणि मिळाली सुद्धा, जुन्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या

Unknown said...

I was searching for this poem for long. I could memorize two stanzas. Here I got it full. Happy to find it here. Thanks to this blog to take me to olden days.

Unknown said...

This poem was for study in 3rd class in balbharti...very nice poem which i have search

Unknown said...

Mala he Kavita 1984 Sali me 4th madhe hoto teva Hoti. Mazhi sarvat avadati Kavita hoti. Mazhya aai ni mazhya kadun path karun ghetli hoti. Aai Nahi rahili. Pun aai chi khup athvan zhali. He Kavita khup shodhat hoto. Aaj ti sapadli. Lahan pun dolya samor ala sagla. Balpanicha kal sukhacha.

Unknown said...

लहनपनाची आठवण जागी झाली

Unknown said...

मी ही कविता वर्ग री मध्ये शिकलो होतो. मला आवडणाऱ्या कवितांपैकी ही एक आहे. लहानपणची आठवण ताजी झाली. धन्यवाद गुगल

Rupali said...

चौथी मध्ये होती कविता.

Unknown said...

मला ४थ्या वर्गात ही कविता बालभारती मध्ये अभ्यासायला होती.माझी खूप खूप आवडती कविता होती आणि अजूनही ही कविता माझी प्रचंड आवडती कविता आहे.तेंव्हा ती तोंडपाठ होती.पण आता पूर्ण आठवत नव्हती.आज सहजच गुगल वर शोधली आणि मला पूर्ण कविता मिळाली.मला फार फार आनंद वाटला.खूप आठवणी मनात गोळा झाल्या. कवियत्री शांता शेळके माझ्या खूप आवडत्या कवियत्री आहेत.खूप समाधान वाटले.आणि यासाठी गुगल आणि या ब्लॉग चे खूप खूप आभार.

Unknown said...

War chya 2 line mazya path hotya , lahanpanapasun mi he visaru shakalo nahi , khup aathawate te diwas ....

दिलीपकुमार डमाळे ७५८८९२८३५५ said...

मी१९८४ ला चौथीमध्ये होतो तेव्हा मला श्री पुंडलिक देशमुख सर होते .दहेगाव ता.जाफ्राबाद जि.जालना.अजुनहीतीकवितामला तोंड्पाट आहे.

दिलीपकुमार डमाळे ७५८८९२८३५५ said...

मी ४ थी ला आसताना हीकविता मला होती.श्री पुडलिक देशमुख सर होते.(दहेगाव ता जाफ्राबाद जि जालना) मला शिकवायला.माझ्या आजुनही ती कविता पाठ आहे.ही कविता मला आज सापडली खूप आनंद झाला.