[जाति : उद्धव; अंतरा व मेळ 'नृपममतें' तील]
"लइ मानस अमुचा, द्यावी आपुल्या घरीं ही पोर
पर शंका येउन कांहीं घेतें मन माघार !
पोरिला हौस मोत्यांची ती तुम्ही कशी पुरवाल ?
हा हेत पडावी कीं ती ज्या घरीं माणकं लाल.
बोलतों
असूं द्या माफि
करा दिलसाफि
असावें चोख व्यवहार तरी बिनधोक !"
"ठेवतां न पोटीं किंतु पुसलेंत — लई आवडलें !
धनदौलत घ्या देखून कांहींच नाहिं लपलेलें
पडवीला कणगी पोतीं मोतीं त्यामधि बिनमोल
दावणीस गायी बैल त्ये अम्हां हिरे अन लाल.
दरसाल
पिकें येतात
खाण शेतांत
तीच सोन्याची" बसलीच गांठ जन्माची.
— यशवंत
No comments:
Post a Comment