A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

5 December 2014

सण एक दिन (बैल पोळा)

शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली
चढविल्या झुलीऐनेदार
राजा, परधान्या, रतन, दिवाण
वजीर, पठाणतुस्त मस्त
वाजंत्री वाजतीलेझिम खेळती
मिरवीत नेतीबैलांलागी
चित्रकार : राजेंद्र गिरधारी
डुल-डुलतात, कुणाची वशिंडे
काही बांड खोंडेअवखळ
कुणाच्या शिंगाना बांधियले गोंडे
हिरवे, तांबडेशोभिवंत
वाजती गळ्यांत घुंगरांच्या माळा
सण बैल-पोळाऐसा चाले
झुलींच्या खालतीकाय नसतील
आसूडांचे वळउठलेले ?
आणि फुटतीलउद्याही कडाड
ऐसेच आसूड पाठीवर !
जरी मिरवितीपरि धन्या-हाती
वेसणी असतीट्ट पाहा
जरी झटकली जराशीहि मान
तरी हे वेसण खेचतील
सण एक दिन ! बाकी वर्षभर
ओझे मरमरओढायाचे !


— यशवंत

23 comments:

Gouri said...

आम्हाला होती ही कविता शाळेत. नाव, कवी आठवत नाही, पण खूप आवडती. इथे टाकल्याबद्दल धन्यवाद!

Unknown said...

मला शाळेत एक कविता होती

उघड पावसा ऊन पडू दे
कुणाकडे उपलब्ध असल्यास share करा

Suresh Shirodkar said...

mahendra patil,
"उघड पावसा ऊन पडू दे" कविता सदर ब्लॉगवर असून त्याची लिंक देत आहे आहे .

http://balbharatikavita.blogspot.in/2012/02/blog-post_29.html

Unknown said...

या कवितेच्‍या कविचे नाव यशवंत आहे.

Suresh Shirodkar said...

धन्यवाद श्रीकांतजी.

kranti said...

The cover page is so memorable..and the illustrative drawings take me to those memory lanes of childhood!! Thanks for sharing!

Unknown said...
This comment has been removed by a blog administrator.
Unknown said...

मला ही कविता 5वि वर्गात होती

Unknown said...

अप्रतिम भजन रुपात सुंदर चाल

Unknown said...

भारी सर

Unknown said...
This comment has been removed by a blog administrator.
Suresh Shirodkar said...

भाले रवि अर्जूनराव, आपली कविता छान आहे पण त्यासाठी हा ब्लॉग नाही. इथे पाठ्यपुस्तकांत अभ्यासक्रमाला असलेल्या कविता संग्रहित केल्या जातात. आपली कविता अभ्यासक्रमात नसल्यामुळे इथून काढुन टाकत आहे.

Moha said...

बालपणी चा काळ आठवला

Unknown said...

अतिशय सुरेख आणि छान कविता आहे ही कविवर्य यशवंत यांच्या लेखणीतुन उतरलेली ही कविता खरोखरच मनाला हळवि आणि भावुक करणारी आहे लहाणपनीची ही कविता पुसटशी आठवत होती .बरेझाले आता संग्रहीत ठेवतो.

Unknown said...

छान

Unknown said...

Khupach chhaan Rachana. Aaj bailpola tya nimittane athavali. Visaru shakat nahi

Kanya Mahavidyalaya Miraj said...

मलाही कविता पाठ होती शाळेत असताना५वीला

Anonymous said...

Nice 1to4

Goknow.in said...

Nice

Unknown said...

कविता खुप छान आहे .गावातील जुन्या आठवणी जागा झाले .

Unknown said...

फार छान बैल यांच्या प्रति आस्था

Unknown said...

खुप छान कविता आहे.मला मराठी शाळेत होती.पोळा सण साजरा करताना या कवितेची आठवण येते.

Unknown said...

Really I revived my childhood memories.and I lost myself and began to sing these poems loudly in the morning near about 5.45 after my morning walk.and my daughter,& son are getup and surprised and peering at me as though something is wrong with pappa.Really this morning was awful for me .Thanks friend you have given me peaceful moment for me.