कोणाला शंका असेल
पण मला निश्चित माहीत आहे,
की माझे नाते
नऊ नक्षत्रांच्या मध्यावर
त्यांना आधार
आणि प्रकाश देत असलेल्या
त्या वैश्विक जाळाशी,
सूर्याशी
आहे—
पण केव्हा अंधारल्या घडीला
मीही विसरतो हे नाते
आणि उकिरड्याच्या कडेला बसलेल्या
भिकार्याप्रमाणे
मी हातात कटोरा घेऊन बसतो
लज्जास्पद,
येत्याजात्या पांथस्थाच्या
अनुदानासाठी.
एखाद्या शेवाळलेल्या क्षणाला
मीही विसरतो ते नाते
आणि भुताटकी वाड्यातील
अमावास्या पीत बसलेल्या
विहिरीप्रमाणे
उबवीत बसतो अंत:करणात
द्वेषमत्सराच्या हिरव्या सर्पाची
चिकट लगदाळी.
एखाद्या विसकटलेल्या दिवशी
मीही विसरतो ते नाते
आणि माझ्या अंगावर ओघळणार्या
हलकटपणावर मात करण्यासाठी
होतो इतका हलकट
इतका
की माझ्या मुखावर चढतो
मी कधीही न मागितलेला
एक भयाण विद्रूप
दिर्गंधी मुखवटा.
पण हे सारे सूर्यद्रोह
मी करीत असताना, केल्यावर,
माझ्या काळजाच्या आंतरदेशात
धगधगून
पेटून उठते एक विराट जंगल,
आणि प्रकाश न देणार्या
भाजून काढते मला
नि:संगपणाने.
आणि त्याने दिलेले आश्वासनही.
— कुसुमाग्रज
पण मला निश्चित माहीत आहे,
की माझे नाते
नऊ नक्षत्रांच्या मध्यावर
त्यांना आधार
आणि प्रकाश देत असलेल्या
त्या वैश्विक जाळाशी,
सूर्याशी
आहे—
पण केव्हा अंधारल्या घडीला
मीही विसरतो हे नाते
आणि उकिरड्याच्या कडेला बसलेल्या
भिकार्याप्रमाणे
मी हातात कटोरा घेऊन बसतो
लज्जास्पद,
येत्याजात्या पांथस्थाच्या
अनुदानासाठी.
एखाद्या शेवाळलेल्या क्षणाला
मीही विसरतो ते नाते
आणि भुताटकी वाड्यातील
अमावास्या पीत बसलेल्या
विहिरीप्रमाणे
उबवीत बसतो अंत:करणात
द्वेषमत्सराच्या हिरव्या सर्पाची
चिकट लगदाळी.
एखाद्या विसकटलेल्या दिवशी
मीही विसरतो ते नाते
आणि माझ्या अंगावर ओघळणार्या
हलकटपणावर मात करण्यासाठी
होतो इतका हलकट
इतका
की माझ्या मुखावर चढतो
मी कधीही न मागितलेला
एक भयाण विद्रूप
दिर्गंधी मुखवटा.
पण हे सारे सूर्यद्रोह
मी करीत असताना, केल्यावर,
माझ्या काळजाच्या आंतरदेशात
धगधगून
पेटून उठते एक विराट जंगल,
आणि प्रकाश न देणार्या
भाजून काढते मला
नि:संगपणाने.
आणि त्याने दिलेले आश्वासनही.
— कुसुमाग्रज
1 comment:
शाळेत मला ही कविता सर्वात जास्त आवडलेली होत. मी पाठच केली होती जवळपास. बरेच दिवस शोधत होतो. मिळाली. आपले मनापासून आभार
Post a Comment