(जाति – झपूर्झा)
हर्षखेद ते मावळले,
मखमालीची लव वठली;
कांही न दिसे दृष्टीला,
झपूर्झा! गडे झपूर्झा !
हर्षशोक हे ज्यां सगळें,
भय न धरु हें वदण्याला:–
व्यर्थी अधिकची अर्थ वसे,
झपूर्झा! गडे झपूर्झा !
ज्ञाताच्या कुंपणावरुन,
नाचत तेथें चकचकते;
अंधुक आकृति तिस दिसती,
झपूर्झा ! गडे झपूर्झा !
नांगरल्याविण भुई बरी
हजारांतुनी एखादा !
तरी न, तेथुनि वनमाला
झपूर्झा ! गडे-झपूर्झा !
पुरुषाशीं त्या रम्य अति
ओळखणें, हा ज्ञानाचा
हेतू; तयाची सुंदरता
झपूर्झा ! गडे-झपूर्झा !
सूर्य चंद्र आणिक तारे
आहे जर जाणें तेथें,
धरा जरा नि:संगपणा,
झपूर्झा ! गडे-झपूर्झा !
— केशवसुत
(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)
हर्षखेद ते मावळले,
हास्य निमालें,कंटक-शल्यें बोथटलीं,
अश्रु पळाले;
मखमालीची लव वठली;
कांही न दिसे दृष्टीला,
प्रकाश गेला,काय म्हणावें या स्थितिला ?–
तिमिर हरपला;
झपूर्झा! गडे झपूर्झा !
हर्षशोक हे ज्यां सगळें,
त्यां काय कळे ?हंसतिल जरि ते आम्हांला,
त्यां काय वळे ?
भय न धरु हें वदण्याला:–
व्यर्थी अधिकची अर्थ वसे,
तो त्यांस दिसे,त्या अर्थाचे बोल कसे ?–
ज्यां म्हणति पिसे;
झपूर्झा! गडे झपूर्झा !
ज्ञाताच्या कुंपणावरुन,
धीरत्व धरुन,चिद्घनचपला ही जाते,
उड्डाण करुन,
नाचत तेथें चकचकते;
अंधुक आकृति तिस दिसती,
त्या गातातीत्या गीतींचे ध्वनि निघती–
निगूढ गीती;
झपूर्झा ! गडे झपूर्झा !
नांगरल्याविण भुई बरी
असे कितितरी;सनदी तेथें कोण वदा ? –
पण शेतकरी
हजारांतुनी एखादा !
तरी न, तेथुनि वनमाला
आणायाला,मात्र गात हा मंत्र चला –
अटक तुम्हांला;
झपूर्झा ! गडे-झपूर्झा !
पुरुषाशीं त्या रम्य अति
नित्य प्रकृतिस्वरसंगम त्या क्रीडांचा
क्रीडा करती
ओळखणें, हा ज्ञानाचा
हेतू; तयाची सुंदरता
व्हाया चित्ता–वाडें कोडें गा आतां–
प्रत ती ज्ञाता
झपूर्झा ! गडे-झपूर्झा !
सूर्य चंद्र आणिक तारे
नाचत सारेखुडित खपुष्पें फिरति जिथें;
हे प्रेमभरें
आहे जर जाणें तेथें,
धरा जरा नि:संगपणा,
मारा फिरके,नाचत गुंगत म्हणा म्हणा–
मारा गिरके,
झपूर्झा ! गडे-झपूर्झा !
— केशवसुत
(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)
No comments:
Post a Comment