घंटा वाजता बंद होय शाळा,
घरी जायाची घाई फार बाळा.
फुले रंगीत फांद्यांवरी आली
'थांब ना रे', बाळास त्या म्हणाली.
बाळ बोले, 'मला वेळ नाही,
घरी जायाची असे फार घाई.'
फुलपाखरु तिथे एक आले,
हट्ट खेळाचा खूप खूप चाले.
बाळ बोले, 'मला वेळ नाही,
घरी जायाची असे फार घाई.'
झाड सोडूनी पक्षी येत खाली,
गीत गाऊन त्यास मोह घाली.
बाळ बोले, 'मला वेळ नाही,
घरी जायाची असे फार घाई.
सखेसोबती तुम्ही सर्व काही,
परी आवडते मला फार आई.'
— अज्ञात
घरी जायाची घाई फार बाळा.
फुले रंगीत फांद्यांवरी आली
'थांब ना रे', बाळास त्या म्हणाली.
बाळ बोले, 'मला वेळ नाही,
घरी जायाची असे फार घाई.'
फुलपाखरु तिथे एक आले,
हट्ट खेळाचा खूप खूप चाले.
बाळ बोले, 'मला वेळ नाही,
घरी जायाची असे फार घाई.'
झाड सोडूनी पक्षी येत खाली,
गीत गाऊन त्यास मोह घाली.
बाळ बोले, 'मला वेळ नाही,
घरी जायाची असे फार घाई.
सखेसोबती तुम्ही सर्व काही,
परी आवडते मला फार आई.'
— अज्ञात
6 comments:
ही कविता कोणत्या इयत्तेची आहे ते सांगा व कोणत्या वर्षाची आहे हे ही सांगा
इयत्ता दुसरी
वर्ष 2009-10
इयत्ता पहिली
G.M.M.V.V School Nanded
Class 4 मराठी पाठ 6
Pahili la hoti mala year 2007 vatta
ही कविता मला माझ्या बालपणीत घेऊन जाते👀
Post a Comment