घड्याळ माझें नवें असे;
सुंदर दिसतें पहा कसें !
दादाचें तर जुनें मुळीं;
झुरळांची वाटे खोली !
घड्याळ माझें लखलखतें;
सांगा कोणाचें आवडतें ?
'उगाच वटवट बोलुं नये;
कटकट कोणा करू नये'
– तूंच नाहिं कां म्हणत असें ?
किटकिट त्याची सदा असे.
दिवसां किटकिट,घड्याळ माझें गुणी मुळीं
रात्रीं किटकिट,
कटकट कधिं ना करी खुळी !
गडबड करितां मार मिळे,
हेंहि न त्याला कसें कळे ?
रात्रीं निजण्याच्या वेळीं
दादा त्याचा कान पिळी;
कुरकुरतें, परि ना खळते,
रागानें चिडूनी जातें;
झोंप लागते दादाला,
तें नच खपतें पण त्याला;
पहाट होतां गुरगुरतें,
दादाला जागें करतें.
दादा उठतो;तेव्हां मग तें गप्पा बसें;
चिमटा घेतो;
घड्याळ माझें कधि न असें !
रात्रीं नशिबीं कोनाडें;
दिवसा करितें पुढेंपुढें.
उगाच बसतें ऎटित
हालवीत अपुले हात;
लहानमोठे हात तसे
पाहुन येई मला हसें.
लाज तयाला ना त्याची;
खोड कोठची जायाची ?
हात असे फिरवुन आधीं
मोडुन घेतें कधींकधीं !
वैद्य आणुनी,दादा देतो पुन्हां जरी,
हात जोडुनी,
फिरवित बसतें हात तरी !
घड्याळ माझें परी पहा;
चाळा त्याला मुळी न हा.
घड्याळ दादाचें, आई,
सर्वांना करितें घाई.
खेळ रंगला असे जरी
मधेंच दादा पुरा करी.
गोष्ट न राजाची सरली;
बाबा म्हणती, 'छे, झाली.'
घड्याळ असलेंघड्याळ माझें गुणी परी,
कुणास सुचलें ?
किती वाजले पहा तरी !
सकाळचे अवघे सात;
म्हणती खेळा बागेंत.
— विंदा करंदीकर
1 comment:
माझ्या आईची फर्माइश.
Post a Comment