सुटी संपली नी चाललों गांवाहुन दूर;
आणिक तव नयनीं लोटला अश्रुंचा पूर.
ताप जरी होता तरी पण जागुनियां रात्रीं
मी निजतां करिशी तयारी मजसाठी सारी;
आणिक हे लाडू तुला मी 'नको, नको' म्हणतां,
नकळत मज भरिशी डब्यांतुन तो भरतां भरतां ll १ll
तेच तुझे लाडू सुखानें मी पुरवुन खातां,
आज उरे मागें तयांतिल आवडता सरता.
वाटतसे घाई कशाला मी इतकी केली ?
नाहीं तर असते अधिकसे उरले या वेळीं.
खाऊ नये वाटे तरी पण शिरतो तोंडात,
आणिक मज भासे तुझा हा भरवितसे हात.
तूं असशी जवळीं दूर ना दूर कोंकणांत;
तूं भरवित असशी तुझ्या मी बसलों ताटांत ll२ll
छे, चुकलें, गेलें; संपला शिल्लक जो होता.
छे, चुकलें, आतां भास ना प्रेमळ तो पुढता.
उजाडेल उद्यां आणखी माधुकरी आली;
उजाडेल उद्यां आणखी वारावर पाळी.
उजाडेल उद्यां आणखी भूक मला खाई;
उजाडेल उद्यां आणखी लाडू मज नाहीं
मिळेल जो मजला उद्यां, तो मी गिळणें घांस
मिळेल ना कोठें असा हा, आई, तव भास ! ll३ll
– विंदा करंदीकर
आणिक तव नयनीं लोटला अश्रुंचा पूर.
ताप जरी होता तरी पण जागुनियां रात्रीं
मी निजतां करिशी तयारी मजसाठी सारी;
आणिक हे लाडू तुला मी 'नको, नको' म्हणतां,
नकळत मज भरिशी डब्यांतुन तो भरतां भरतां ll १ll
तेच तुझे लाडू सुखानें मी पुरवुन खातां,
आज उरे मागें तयांतिल आवडता सरता.
वाटतसे घाई कशाला मी इतकी केली ?
नाहीं तर असते अधिकसे उरले या वेळीं.
खाऊ नये वाटे तरी पण शिरतो तोंडात,
आणिक मज भासे तुझा हा भरवितसे हात.
तूं असशी जवळीं दूर ना दूर कोंकणांत;
तूं भरवित असशी तुझ्या मी बसलों ताटांत ll२ll
छे, चुकलें, गेलें; संपला शिल्लक जो होता.
छे, चुकलें, आतां भास ना प्रेमळ तो पुढता.
उजाडेल उद्यां आणखी माधुकरी आली;
उजाडेल उद्यां आणखी वारावर पाळी.
उजाडेल उद्यां आणखी भूक मला खाई;
उजाडेल उद्यां आणखी लाडू मज नाहीं
मिळेल जो मजला उद्यां, तो मी गिळणें घांस
मिळेल ना कोठें असा हा, आई, तव भास ! ll३ll
– विंदा करंदीकर
15 comments:
काही वर्षांपुर्वी मी या कवितेचा शोध घेत होतो पण तेंव्हा ती internet वर उपलब्ध नव्हती, आज अचानक आठवण झाली आणी पाहिली तर दरम्यानच्या काळात कोणीतरी ती केली असावी. As someone who left home at the age of 17 for higher education and never really went back for any extended period of time, this poem has - and will continue to have - a special place in my heart. आज इतक्या वर्षांनी ही कविता पूर्ण रूपात वाचताना, या कवितेचा आईला hostel मधून लिहीलेल्या पत्रातला उल्लेख आठवला आणि नकळत डोळे भरून आले.
Sudhir Oak said...
काही वर्षांपुर्वी मी "शेवटचा लाडू" या कवितेचा शोध घेत होतो पण तेंव्हा ती internet वर उपलब्ध नव्हती, आज अचानक आठवण झाली आणी पाहिली तर दरम्यानच्या काळात ती इथे upload झाली होती. As someone who left home at the age of 17 for higher education and never really went back for good, this poem always had a special place in my heart. I had referred to this poem in my letter to my parents when the लाडूचा डबा my mom gave me to take with was about to finish. Reading it after all those years, was both emotionally rewarding and challenging, it was tough the hold back the moisture wanting to come out of the eyes!!! You just made my day.
मी ही कविता शोधत hote. अचानक milali. खूप भाऊक कविता ahe. आजही वाचताना डोळ्यात पाणी येते . सुधा कुलकर्णी
मी खूप दिवस ही कविता शोधत होते.आज सापडली आम्हाला ई.5ला होती आता वाचून खूप आनंद झाला. खूप धन्यवाद
फार ह्रदयस्पर्शी कवीता
माझी आवडती कविता.
सापडली एकदाची
आज 75 व्या वर्षी मी ही कविता आठवत होतो. पण पहिल्या दोन ओळीच्या पुढे काहीही येत नव्हते. 65 वर्षांनी वाचायला मिळाली. बरे वाटले.
शेवटचा लाडु... इयत्ता ५ वी मधील कविता वाचुन बालपणाची आठवण आली..!!
कविता सापडली आणि शाळेच्या वर्गातले दिवस आठवले. त्यावेळी सुद्धा ही कविता वाचताना डोळ्यात पाणी यायचे. माझे वडील 3 री पास झाल्यावर 4थी पासून मुंबईत श्री बापट यांचे घरी आले. त्यांच्या घरातील पडतील ती कामं करून रोज एका घरी वारावर जेवायला जात. त्यांनी दिलेल्या वह्या, पुस्तक घेऊन अभ्यास केला. मॅट्रिक ला त्या काळी सर्व विषयात distinction मिळवले. प्रमोद आपटे.
Wow sir
आणखी एक कविता होती , त्याच्या 2/3 ओळीच मला आठवतात , कोणालाही ही कविता माहिती असेल तर / मिळाली तर नक्कीच मला पाठवा ही विनंती 🙏🙏🙏
ह्या त्या ओळी ,
खुजबुज, खुजबुज, खुजबुज, खुजबुज रे
चंदनाच्या झाडाखाली पानं का वाजे
चंदनाच्या झाडाखाली आल्या सावल्या
दिवसाच्या उन्हाने त्या होत्या कावल्या
नका धावू , नका पळू जमा जमा हळूहळू
हरणांनो ,पाडसांनो कोंडीत शिरा
.........
.........
माझी आई ही कविता फार आवडीने म्हणायची. तिच्या आवाजातील रेकॉर्ड नाही करू शकलेअसं वाटल की तिच्याबरोबर गेली ही कविता पण खूप आभार मला ती मिळाली. खूप खूप धन्यवाद
1964-65 ला अभ्यासाला होती.अजूनही बरीचशी पाठ आहे.3-4 वर्ष शोधत होतो.नातवंडांना ऐकवायची होती.अजूनही भरून येते.
खूप दिवस झाले शेवटचा लाडूही कविता आठवत होती,आज मी ७४ व चा आहे. ही कविता नेट वर उपलब्द केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
बऱ्याच वेळा वाटते की आपल्या वेळच्या कविता आणि जुनी गाणी काळाच्या उदरात नाहीश्या होणार का पण अश्या स्तुत्य उपक्रमामुळे त्या जिवंत राहतील,
असाच एक श्लोक माझे वडील सांगायचे , जर कोणाला ती माहिती असेल तर सांगा, त्याच्या ओळी अश्या आहेत, ती प्रभू रामचंद्रांची आहे
सूर्य वंशी राघवे शी(नि) हा तुरंग सोडीला,
ह्यासी जो धरील तो नृपात वीर आगळा,
सैन्य हे करील युद्ध .....
दिलीप देशपांडे
Post a Comment