पाऊस असतो तलम पोताचा
कापुरी कायेचा रेशमी हाताचा ...
पाऊस असतो खरा सहोदर
नभात जाऊन गाठतो सागर ...
पाऊस असतो जीवाचा भावाचा
सुख - दु:खांतून डोळ्यात यायचा ...
पावसाची दृष्टी असते सारखी
पहाड असो वा टेकडी बारकी ...
पाऊस सांगतो मोठी घ्या भरारी
ओट्याची नदीत, नदीची सागरी ...
पाऊस सोसतो विजांचा सुकाळ
तरी अमृताचे ओठांत कल्लोळ ...
पावसासारखं कुठं नातं गोतं?
काहीच न घेता फक्त राही देत ...
पाऊस रिकाम्या हातानं येईना
जाताना काहीही घेऊन जाईना ...
— विठ्ठल वाघ
(Compiled by : Ms. Bhakti Parab, Mumbai)
कापुरी कायेचा रेशमी हाताचा ...
पाऊस असतो खरा सहोदर
नभात जाऊन गाठतो सागर ...
पाऊस असतो जीवाचा भावाचा
सुख - दु:खांतून डोळ्यात यायचा ...
पावसाची दृष्टी असते सारखी
पहाड असो वा टेकडी बारकी ...
पाऊस सांगतो मोठी घ्या भरारी
ओट्याची नदीत, नदीची सागरी ...
पाऊस सोसतो विजांचा सुकाळ
तरी अमृताचे ओठांत कल्लोळ ...
पावसासारखं कुठं नातं गोतं?
काहीच न घेता फक्त राही देत ...
पाऊस रिकाम्या हातानं येईना
जाताना काहीही घेऊन जाईना ...
— विठ्ठल वाघ
(Compiled by : Ms. Bhakti Parab, Mumbai)
1 comment:
खूप सुंदर कविता आहे ही कविता मी शाळेत शिक्षण घेत असताना ऐकली होती तेव्हा पासून आज पर्यंत ती गुंगूनतो
Post a Comment