चांद्यापासून बांद्यापर्यंत एक सूर एक ताल
एक गाऊ विजयगान जय जवान, जय किसान!
जय जवान, जय किसान, जय जय!
अखिल देश पाठिशी, 'जवान' व्हा रणी चला
किसान होऊनी कसा, भूमि सस्य शामला
यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
जय जवान, जय किसान!
शत्रू-मित्र जाणुनी, सावधान सर्वदा
आपल्या श्रमे करू, प्रसन्न देवी अन्नदा
उभ्या जगात आपुली, सदैव उंच ताठ मान
जय जवान, जय किसान!
अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
भूमिदास दाखवी, निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधु आसमान
जय जवान, जय किसान!
— ग. दि. माडगुळकर
(सौजन्य: आठवणीतली गाणी डॉट कॉम)
एक गाऊ विजयगान जय जवान, जय किसान!
जय जवान, जय किसान, जय जय!
अखिल देश पाठिशी, 'जवान' व्हा रणी चला
किसान होऊनी कसा, भूमि सस्य शामला
यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
जय जवान, जय किसान!
शत्रू-मित्र जाणुनी, सावधान सर्वदा
आपल्या श्रमे करू, प्रसन्न देवी अन्नदा
उभ्या जगात आपुली, सदैव उंच ताठ मान
जय जवान, जय किसान!
अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
भूमिदास दाखवी, निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधु आसमान
जय जवान, जय किसान!
— ग. दि. माडगुळकर
(सौजन्य: आठवणीतली गाणी डॉट कॉम)
2 comments:
माझ्या आठवणी नुसार, कवितेची सुरुवात अशी आहे:
"चांद्यापासून बांद्यापर्यंत एक सूर एक ताल.."
बरोबर आहे. "चांद्यापासून बांद्यापर्यंत एक सूत्र एक ताल" अशीच सुरवात आहे.
Post a Comment