प्रवासी मी दिगंताचा
युगे युगे माझी वाट
मज चालायचे असो
सुख, दुःख, माळ, घाट
झेप गरुडाची अंगी
शस्त्र विज्ञानाचे हाती
श्रम-शास्त्राच्या युतीने
पृथ्वी करीन थांबती
चंद्र, सूर्य, ग्रह, तारे
तुडवीन पायदळी
स्वर्गातुनी सुरासुर
पाठवीन मी पाताळी
वारा करीन गुलाम
वर्षा बांधीन दाराशी
माझे वैभव पाहूनी
लक्ष्मी लाजेल स्वतःशी
जे जे असेल अज्ञात
घेता करुनि या ज्ञात
पाठीवरी मात्र हवा
कुण्या प्रेमळाचा हात
— राम मोरे
युगे युगे माझी वाट
मज चालायचे असो
सुख, दुःख, माळ, घाट
झेप गरुडाची अंगी
शस्त्र विज्ञानाचे हाती
श्रम-शास्त्राच्या युतीने
पृथ्वी करीन थांबती
चंद्र, सूर्य, ग्रह, तारे
तुडवीन पायदळी
स्वर्गातुनी सुरासुर
पाठवीन मी पाताळी
वारा करीन गुलाम
वर्षा बांधीन दाराशी
माझे वैभव पाहूनी
लक्ष्मी लाजेल स्वतःशी
जे जे असेल अज्ञात
घेता करुनि या ज्ञात
पाठीवरी मात्र हवा
कुण्या प्रेमळाचा हात
— राम मोरे
सागर पालकर यांच्या मदतीने साभार.
10 comments:
शतशः आभार या ब्लॉग साठी.... गेले कित्येक दिवस मी माझ्या बालपणीच्या कवितांचा ब्लॉग शोधात होतो....
खूप खूप धन्यवाद...
खूप छान....:)
mazi khup avadti kavita
जुन्या आठवनी जाग्या झाल्या
Mazya balpanachi aathavan aali he kavita mala aatahi mukhpath aahe
School 🏫memories. Missing those days 💗😭
dhayawad hn.. sapadli ekdach..
आजही मी विसरलो नाही ही कविता खूप छान आहे
Ho.din.an.na.rage.gele.the.diwas.mitra.rahilya.tyaaatvanimitra
खुप छान ब्लॉग आहे 🙏🏻, जर धडे पण मिळाले असते तर खूप बरं वाटलं असतं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Renainsa
Post a Comment