लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी ना, शोधुनी दुसर्या लाख
किति गोरी गोरी, गाल गुलाबच फुलले
हासती केस ते सुंदर काळे कुरळे
झाकती, उघडती निळे हासरे डोळे
अन् ओठ जसे की, अताच खुदकन हसले
मिळणार तशी ना, शोधुनी दुसर्या लाख
किति गोरी गोरी, गाल गुलाबच फुलले
हासती केस ते सुंदर काळे कुरळे
झाकती, उघडती निळे हासरे डोळे
अन् ओठ जसे की, अताच खुदकन हसले
अंगात शोभला झगा रेशमी लाल
केसांवर फुलले लाल फितीचे फूल
कितितरी बाहुल्या होत्या माझ्याजवळी
पण तीच सोनुली फार मला आवडली !
मी तीजसह गेले माळावर खेळाया
मी लपून म्हणते, 'साई सुट्ट्य हो ! या या !'
किति शोधशोधली कुठे न परी ती दिसली
परतले घरी मी होउन हिरमुसलेली !
वाटते सारखे जावे त्याच ठिकाणी
शोधुनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी
जाणार कशी पण ? संतत पाउस-धार !
खळ मुळी न तिजला, वारा झोंबे फार
तिजसाठी रडले रात्रंदिन मी बाई
किति खेळ भोवती, हात लावला नाही !
स्वप्नात तिने मम रोज एकदा यावे
हलवून मला हळु माळावरती न्यावे
पाऊस उघडता गेले माळावरती
गवतावर ओल्या मजला सापडली ती !
कुणि गेली होती गाय तुडवुनी तिजला
पाहूनी दशा ती—रडूच आले मजला
मैत्रिणी म्हणाल्या, 'काय अहा, हे ध्यान !
केसांच्या झिपर्या—रंगहि गेला उडुन !'
परी आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली होती—माझी म्हणुनी !
— इंदिरा संत
6 comments:
माझ्या लाडक्या कवितांतील एक कविता.
तिजसाठी रडले रात्रंदिन मी बाई,किती खेळ भोवती हात लावला नाही.या ओळी या कवितेत कुठे दिसतं नाहीत
धन्यवाद (Unknow) चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल.
काही ठिकाणी शांता शेळके यांनी लिहिली आहे अशी माहिती मिळाली. खरे काय आहे?
मलाही संभ्रम आहे, पण बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे कि हि इंदिरा संत यांची कविता आहे,
आहे ही ओळ
Post a Comment