पावसाच्या धारा, येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे सोसाट्याचा वारा
रस्त्यालें ओहळ, जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्यें तुडुंबलें जळ
ढगांवर वीज, झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज
झोंबे अंगा वारे, काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसलीं पांखरें
हर्षलासे फार, नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार
पावसाच्या धारा, डोईवरी मारा
झाडांचिया तळी गुरें शोधिती निवारा
नदीलाही पूर, लोटला अपार
फोफावत धांवे जणूं नागीणच थोर
झाडांची पालवी, चित्ताला मोहवी
पानोपानीं खुलतसें रंगदार छवी
थांबला पाऊस, उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश
किरण कोंवळे, भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुलें
पावसात न्हाली, धरणी हांसली,
देवाजीच्या करणीने, मनी संतोषली !
कवयित्री — शांता ज. शेळके
झांकळलें नभ, वाहे सोसाट्याचा वारा
रस्त्यालें ओहळ, जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्यें तुडुंबलें जळ
ढगांवर वीज, झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज
झोंबे अंगा वारे, काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसलीं पांखरें
हर्षलासे फार, नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार
पावसाच्या धारा, डोईवरी मारा
झाडांचिया तळी गुरें शोधिती निवारा
नदीलाही पूर, लोटला अपार
फोफावत धांवे जणूं नागीणच थोर
झाडांची पालवी, चित्ताला मोहवी
पानोपानीं खुलतसें रंगदार छवी
थांबला पाऊस, उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश
किरण कोंवळे, भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुलें
पावसात न्हाली, धरणी हांसली,
देवाजीच्या करणीने, मनी संतोषली !
कवयित्री — शांता ज. शेळके
7 comments:
लहानपणीची आठवण आली
माझ्या आवडीची कविता खूप दिवसाने वाचावयास मिळाली आपले मनःपूर्वक आभार....
I feel my childhood days when I m In 4th class
बालपणीचा काळ सुखाचा
या कविता कायमच्या मनात घर करून आहेत.
वाटते पुन्हा एकदा शाळेत जाऊन बसावे एका सुरात एका तालात सामूहिक रित्या या कविता मनमोकळे पणाने म्हणाव्या. या पेक्षा वेगळं सुख म्हणजे नक्की काय असतं……
खरच लहानपणी कविता मुखोद्गत आहेत, त्या आठवल्या तरी बालपणाच्या आठवणी ने मनात काहूर माजते. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी
गाढे अशोक दिगंबर पांगरगाव
माझी आजी दुसरीला होते तेव्हाची ही कविता आहे
Post a Comment