साजिरे गोजिरे, गवताचे फूल
इवल्याशा झुळकीचे, नाचरे मुल
लपत छपत,
हसत खेळत
वाटसरुंना
पाडिते भूल
साजिरे गोजिरे, गवताचे फूलहसत खेळत
वाटसरुंना
पाडिते भूल
ऊन झलोनी,
दव पिवोनी
उजाड रानात
घालिते शीळ
साजिरे गोजिरे, गवताचे फूलदव पिवोनी
उजाड रानात
घालिते शीळ
कोणा ते रुचले,
कोणा ते बोचले
सर्वां हाकारुन
मांडिते खेळ
साजिरे गोजिरे, गवताचे फूलकोणा ते बोचले
सर्वां हाकारुन
मांडिते खेळ
साजिरे गोजिरे, गवताचे फूल
इवल्याशा झुळकीचे नाचरे मुल
अनुवाद – लक्ष्मीनारायण बोल्ली
(मूळ तेलुगु कवी – कोंडल वेंकटरावुगारु)
लक्ष्मीनारायण बोल्ली (१५ एप्रिल, १९४४ – २३ फेब्रुवारी, २०१८)
लक्ष्मीनारायण बोल्ली हे एक मराठी लेखक, अनुवादक व संशोधक होते. बोल्ली यांनी तेलुगु आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून स्वतंत्र कविता व ललित लेखन केले असून ‘तेलुगु’ भाषेतील उत्तमोत्तम साहित्य मराठीत आणले आहे.