झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.
सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.
— मंगेश पाडगांवकर
सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला.
हिरव्या हिरव्या फांदीला ग,
झुला माझा बांधिला ग,
आता होता भुईवर, भेटे आभाळाला.झुला माझा बांधिला ग,
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.
उंच उंच जाते मी ग,
झुल्यासंगे गाते मी ग,
गाता गाता वाऱ्याने या झोका मला दिला.झुल्यासंगे गाते मी ग,
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.
जिथे जिथे झुला झुले
तिथे तिथे सारी फुले.
झुल्यासंगे झुला, बाई, फुलासंगे फुला.तिथे तिथे सारी फुले.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.
झुला झाला अनावर,
जीव माझा खालीवर.
माया याची माझ्यावर, सांभाळतो मला.जीव माझा खालीवर.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.
झुला माझा पाखरू ग,
वाऱ्याचे हे लेकरू ग.
एक झोका मला आणि एक झोका तुला.वाऱ्याचे हे लेकरू ग.
झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला.
— मंगेश पाडगांवकर
No comments:
Post a Comment