आली दिपवाळी, गड्यांनो, आली दिपवाळी || ध्रु o ||
रोज रोज शाळा, पुरे तो आला कंटाळा
चार दिवस आतां, मनाला कसली ना चिंता
उडूं बागडूं जशीं पाखरें स्वैर अंतराळी || १ ||
मौजेनें न्हाऊं,कपाळींलाल गंध लावूं,
अलंकार लेवूं,करोनी थाटमाट जेवूं,
लाडू, करंज्या, शंकरपाळी खाऊं कडबोळीं || २ ||
खेळगडी नाना जमवुनी खेळू खेळांना
बांधुनिया किल्ले करू या तयावरी हल्ले
भावी पुरुषार्थाचे कित्ते गिरवू या काळी || ३ ||
नळे, चंद्रज्योती, फटाके, फुलबाज्या, वाती
दारूकाम सोडू धडाधड बार नवे काढू
उडवू बंदूक लुटीपुटीची घालूनिया गोळी || ४ ||
खेळगडी ना ना जमवुनी खेळू खेळांना
बांधुनिया किल्ले करूया तयावरी हल्ले
भावी पुरुषार्थाचे कित्ते गिरवूया काळी || ५ ||
खेळाचा धंदा येतसे भरती आनंदा
फारच गमतीचे खरोखर दिवस दिवाळीचे
तुच्छ कडी, अंगठ्या, कंठी, भिकबाळी || ६ ||
— माधवानुज

No comments:
Post a Comment