भयाण अंधाराने होते जीव कोंदुनि गेले,
जोखड वाहत मानेवरती जगणे नशिबी आले
तुकड्यांसाठी मान विकुनिया केली भिक्षांदेही,
निजधर्माची वा देशाची चाडच उरली नाही
पालखीतुनी मिरवत होते ते विकले गेलेले,
स्वाभिमान अन् क्षात्रतेज तर धुळीत मिळुनी गेले.
या अंधारी दिशादिशांवर प्रकाश फेकित येसी
महानतेचा मानदंड तू, महाराष्ट्री अवतरसी.
स्पर्श तुझ्या पायांचा हो अन् पेटुनि उठली माती,
पायतळीचे दगडहि उठले मिळवित प्राणज्योती.
नजर तुझी संजीवक पडता वठल्या झाडावरती,
समशेरींसह लाख मावळे वीर प्रगटले भवती.
झोपड्यांतुनी उभे ठाकले सशस्त्र गड अन् किल्ले,
तोफांनाही अजिंक्य ठरले केवळ बरच्या, भाले.
पराभूत ही भूमी उठली शस्त्रास्त्रे परजुनिया,
महाराष्ट्राला महानतेप्रत नेसी तू शिवराया !

— पद्मा विष्णू गोळे
No comments:
Post a Comment