नौबत आता झडू दे ,
जातपात ना आम्ही मानित,
इथली गरिबी आम्ही हटवू,
लाज न आम्हां मुळी श्रमाची,
विज्ञानावर अमुची भक्ती,
उंच उंच स्वर चढू दे ,जय जय भारत विजयघोष हा या गगनाला भिडू दे.
जातपात ना आम्ही मानित,
धर्मभेद ना आम्ही जाणत,तेज आमुच्या हृदयामधले काळोखावर पडू दे.
इथली गरिबी आम्ही हटवू,
समता सगळ्या जगास पटवू,अन्यायाच्या विरुध्द अमुची शूर मनगटे लढू दे.
लाज न आम्हां मुळी श्रमाची,
हाक ऐकतो पराक्रमाची,नव्या जगाची नवीन मूर्ती या हातांनी घडू दे.
विज्ञानावर अमुची भक्ती,
माणुसकी हि अमुची शक्ती,भिऊन दडली सर्व पांखरे निर्भर होऊन उडू दे.
— मंगेश पाडगावकर
No comments:
Post a Comment