उद्याचीच भाऊबीज
कोण मला ओवाळील ?
कोण ओवाळणीसाठी
मजसवे झगडील ?
इथे आज पडलो मी
माझ्या गावाहून दुर,
'कुणा घालू ओवाळणी ?'
लागे मला हुरहूर.
इथे साऱ्याच बहिणी,
परक्या या नगरात,
परी असे निराळीच
माझ्या बहिणीची प्रीत.
कसे बहिणीचे नाते !
कशी बहिणीची माया !
ओवाळणी मागतसे
सालभर भांडुनिया !
उद्याचीच भाऊबिज
महोत्सव घरोघरी,
आणि पाहीन हे सारे
एकटाच वेड्यापरी !
— सुरेश भट
कोण मला ओवाळील ?
कोण ओवाळणीसाठी
मजसवे झगडील ?
इथे आज पडलो मी
माझ्या गावाहून दुर,
'कुणा घालू ओवाळणी ?'
लागे मला हुरहूर.
इथे साऱ्याच बहिणी,
परक्या या नगरात,
परी असे निराळीच
माझ्या बहिणीची प्रीत.
कसे बहिणीचे नाते !
कशी बहिणीची माया !
ओवाळणी मागतसे
सालभर भांडुनिया !
उद्याचीच भाऊबिज
महोत्सव घरोघरी,
आणि पाहीन हे सारे
एकटाच वेड्यापरी !
— सुरेश भट
1 comment:
खूपच छान! लहानपणी वर्गात ऐकलेली सुरेश भट यांची भाऊबीज कविता वाचून आनंद झाला!
Post a Comment