आज ये अंगणा,ये घरा आमुच्या, सोयरा साजिरा ॥
पाहुणा गोजिरा
वाजवा नौबती,खेळवा संगती, हा जरा लाजरा ॥
ये सखा सोबती,
कोवळे देहुडे,पोपटी अंगडे, शोभते सुंदरा ॥
सावळे रूपडे
हा वसंतासवें,पालवे, बोलवे, सानुल्या पाखरां ॥
सृष्टीला हासवे,
श्रावणीं न्हातसे,साउली देतसे, भूमिच्या लेकरां ॥
आश्विनीं गातसे,
बासरी ऐकतो,नाचतो, डोलतो, झोंबतो अंबरा ॥
चांदणे झोकतो,
अंगारेखांतुनी,वाहतो जीवनीं, अमृताचा झरा ॥
पर्णशाखांतुनी,
गीत गाता मुखी,विश्व व्हाया सुखी, या नव्या जागरा ॥
नाचवा पालखी,
सूर्य देवो, द्धुतीछत्रछायाकृती, मित्र आला घरा ॥
चंद्र देवो द्रुती,
— वसंत बापट
No comments:
Post a Comment