कुणा आवडतो मोर पिसाऱ्याचा
असे कोणाला छंद कोकिळेचा;
कुणी असतो नादिष्ट पोपटाचा
मला आहे परि नाद कोंबड्याचा ! II १ II
करायाचें नज काय पिसाऱ्याचें ?
मधुर-कंठा पक्षिणी कोकिळेचें ?
खाद्य खाया देतांच बोलतो जो
असा नटवा शुक तुम्हां आवडो तो ! II२II
किती माझा कोंबडा ऐटदार ,
चाल त्याची किति बरें डौलदार !
शिरोभागीं छानसा तुरा हाले
जणूं जास्वंदी-फूल उमललेलें ! II ३ II
पिसारा त्याचा किती झोंकदार
चोंच त्याची चिमुकली बांकदार !
अर्ध पायीं पांढरीशी विजार
गमे विहंगातिल बडा फौजदार ! II ४ II
"उठा मूर्खांनो ! झोंप काय घेतां ?
अरुण-उदयाचा काल असे आतां !
करा कांहींतरि आळसा त्यजून, "
उष:कालीं सांगतो ओरडून ! II ५ II
किती माझा कोंबडा हो शहाणा
लोक-कल्याणा झटतसे पहा ना !
बरें-वाईट त्या म्हणा कुणी कांहीं
प्राप्त-कर्तव्या सोडणार नाहीं ! II ६ II
लोक-कल्याणीं दक्ष असा प्राणी
जगीं मजला या दिसत नसे कोणी !
मोर, पोपट, कोकिळा, राजहंस
रिकाम्यांचा या बडेजाव खास ! II ७ II
अती परिचय जाहला कोंबड्याचा
म्हणुनि करितां का मानभंग त्याचा ?
जरी आवडला नाहिं तो तुम्हांला
सदा देई आनंद मन्मनाला ! II ८ II
— दत्तप्रसन्न कारखानीस
असे कोणाला छंद कोकिळेचा;
कुणी असतो नादिष्ट पोपटाचा
मला आहे परि नाद कोंबड्याचा ! II १ II
करायाचें नज काय पिसाऱ्याचें ?
मधुर-कंठा पक्षिणी कोकिळेचें ?
खाद्य खाया देतांच बोलतो जो
असा नटवा शुक तुम्हां आवडो तो ! II२II
किती माझा कोंबडा ऐटदार ,
चाल त्याची किति बरें डौलदार !
शिरोभागीं छानसा तुरा हाले
जणूं जास्वंदी-फूल उमललेलें ! II ३ II
पिसारा त्याचा किती झोंकदार
चोंच त्याची चिमुकली बांकदार !
अर्ध पायीं पांढरीशी विजार
गमे विहंगातिल बडा फौजदार ! II ४ II
"उठा मूर्खांनो ! झोंप काय घेतां ?
अरुण-उदयाचा काल असे आतां !
करा कांहींतरि आळसा त्यजून, "
उष:कालीं सांगतो ओरडून ! II ५ II
किती माझा कोंबडा हो शहाणा
लोक-कल्याणा झटतसे पहा ना !
बरें-वाईट त्या म्हणा कुणी कांहीं
प्राप्त-कर्तव्या सोडणार नाहीं ! II ६ II
लोक-कल्याणीं दक्ष असा प्राणी
जगीं मजला या दिसत नसे कोणी !
मोर, पोपट, कोकिळा, राजहंस
रिकाम्यांचा या बडेजाव खास ! II ७ II
अती परिचय जाहला कोंबड्याचा
म्हणुनि करितां का मानभंग त्याचा ?
जरी आवडला नाहिं तो तुम्हांला
सदा देई आनंद मन्मनाला ! II ८ II
— दत्तप्रसन्न कारखानीस
1 comment:
कोंबडा हा माझा ही प्रिय आहे.
Post a Comment