'दुर्ग भयकंर जीर्ण पसरला पढुतीं' , जो गतकालीं
शूर साहसी नरसिंहांनीं अपुली वसती केली'
कड्याकड्यांमधिं घुमुनि नर्मदा गात यशोमय गीतें
शूर साहसी नरसिंहांनीं अपुली वसती केली'
कड्याकड्यांमधिं घुमुनि नर्मदा गात यशोमय गीतें
रंगमहालीं शेज फुलांची याच गडावर झाली,
स्वातंत्र्यास्तव अग्नि भडकला– राख तयाची केली.
तरवारीची धार देवता हीच जयांची एक,
ब्रीद जयाचें सदा तियेला रुधिराचा अभिषेक.
जीव नव्हे संसार ओतिला स्वातंत्र्यास्तव ज्यांनी,
त्या वीरांचा वास जाहला गतकालीं या स्थानीं.
आतां कोणी क्षुद्र पुजारी देविस पूजायातें
घालित बसतो कुंकुमपूरित चंदन अपुल्या हस्तें,
आणि पिवोनी भांग दुखारी झिंगत वदतो कांहीं
पुर्वकथा निर्विकार चित्तें…हर्षित दोन पयांहीं.
हे काळाचे खेळ, कुठेंही असेच चालायाचे,
त्यास कशाला परि आम्हांला कांहिं न वाटे त्याचें.
एक खुराडें– भाडयाचे तें– राहूं त्यांत खुशाल
क्षुद्र जिवांना अम्हां कशाला असले रंगमहाल !
— बालकवी
No comments:
Post a Comment