लढा वीर हो लढा लढा
पराक्रमाने अधिक उंचवा हिमालयाचा कडा कडा
शेजार्यांचे शूर शिपाई
सीमारेषा पुसुनी पायी
लुटु पाहती तुमची आई
त्या ढोंग्यांच्या मुसक्या बांधा, भ्याडा हाती भरा चुडा
काल बिलगले भाऊ म्हणुनी
आज शांतीला दुर्बल गणुनी
काढु पाहती मूळच खणुनी
तोडा त्यांचे हात अडाणी, कबंध तुडवीत चढा चढा
रणमर्दांनो तुमच्या पाठी
मारीत मारीत मरण्यासाठी
उभा भारतीय चाळीस कोटी
हटवा मागे पिशाच्च पिवळे, उडू द्या तोफा धडाधडा
— ग. दि. माडगूळकर

No comments:
Post a Comment